Elon Musk आता काय म्हणावे; पुरविणार अंबट शौकिनांचे चोचले

| Updated on: Mar 30, 2024 | 10:46 AM

Elon Musk X : सोशल मीडियावर प्रौढांसाठीचा कंटेंट सहज पुढ्यात येतो. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर या अश्लिल कंटेंटचा सध्या मारा दिसतो. त्याविरोधात रिपोर्ट केल्यावर तो काढण्यात येतो. लवकरच असा कंटेंट एलॉन मस्क याच्या एक्स या मायक्रो ब्लॉगिंगवर दिसून येईल. येत्या काळात लेबलसह हा कंटेंट अंबट शौकिनांचे डोळे दिपवणार आहे.

Elon Musk आता काय म्हणावे; पुरविणार अंबट शौकिनांचे चोचले
X वर डोळे दिपणार
Follow us on

सोशल मीडियावरील मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X मध्ये कायम प्रयोग सुरु असतात. या प्लॅटफॉर्मचे नाव, लोगो इतकेच काय कर्मचारी, कार्यालय सगळं-सगळं काही एका त्सुनामीत बदलून गेलं. अर्थात एलॉन मस्क नावाची ही त्सुनामी आहे. या मायक्रो ब्लॉगिंगला या प्रयोगाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. उत्पन्नाचे झरे आटले आहेत. अनेक जुन्या साथीदारांनी हात वर केले आहेत. तर जाहिरातदारांनी चार हात दूर केले आहेत. त्यामुळे एलॉन मस्क याने एक हुकमी कार्ड फेकले आहे. प्रौढांसाठी असलेला कंटेंट आता लेबलसहित एक्सवर दिसेल.

गवसले कामाचे सूत्र

अर्थात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंबट शौकिनांसाठीच्या कंटेंटची कमतरता नाही. ते अचानक पुढ्यात येत असल्याने सहज नजरेस पडतात. पण याविषयीचा रिपोर्ट केल्यास हा कंटेंट हटविण्यात पण येतो. अशा कंटेटला प्रोत्साहन देण्यात येत नाही. एक्सने याविषयीच्या कंटेंटसाठी मंजूरी दिल्याचे समोर येत आहे. पण त्यांनी अधिकृतरित्या याविषयीची भूमिका जाहीर केलेली नाही. इन्स्टाग्राम आणि इतर समाज माध्यमांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एलॉन मस्क याला कामाचे सूत्र गवसल्याचा चिमटा पण अनेक जण काढत आहेत.

हे सुद्धा वाचा

खास लेबलखाली कंटेट

याविषयी समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रौढ कंटेंटसाठी युझर्स कम्युनिटी तयार करु शकतील. त्यांना सेटिंगमध्ये याविषयीची माहिती लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याविषयीचा स्क्रीनशॉट ॲनालिस्ट Daniel Buchuk यांनी शेअर केला आहे. डॅनिअल ॲप्स विकसाबाबत माहिती जमा करतो आणि त्याविषयी युझर्सला अपडेट देतो. एक्सच्या सेटिंगमध्ये लवकरच साधं कंटेंट तर प्रौढ कंटेंट अशा नामफलक, लेबल लागलेले असेल. ते युझर्सच्या सहज नजरेत येईल.

तर होईल कारवाई

  1. जे युझर्स या मार्गदर्शक तत्वांचा, नियमांचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर एक्स कारवाई करणार आहे. एखाद्या युझर्सने अशा आशयाचा कंटेंट एक्सवर अपलोड करताना जर प्रोढ कंटेंट हे लेबल लावले नाही तर फिल्टरमध्ये असा कंटेंट आपोआप हटविण्यात येईल. पण त्याने याविषयीचे लेबल लावल्यानंतर त्यावर कारवाई होणार नाही.
  2. कोणाला पण असा कंटेंट अपलोड करता येणार नाही. तुमच्या वयाची पडताळणी झाल्याशिवाय युझर्सला असा कंटेंट अपलोड करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. युझर्स अशा प्रकारची त्याची कम्युनिटी ही खासगी श्रेणीत ठेऊ शकतो. या कम्युनिटीचा, भाग होण्यासाठी अर्थातच वयाचा पडताळा आणि ॲडमीनची परवानगी लागेल.