Facebook : भारतातून फेसबुकचा बाजार उठणार? मेटाच्या अंतर्गत रिसर्चमध्ये समोर आली धक्कादायक माहिती…

| Updated on: Jul 21, 2022 | 9:49 PM

भारताची लोकसंख्या पाहता सोशल मीडियासाठी भारत एक मोठे मार्केट म्हणून जगात समोर आले आहे. अशा परिस्थितीमध्ये फेसबुकच्या लोकप्रियतेमध्ये घट होणे ही मेटासमोरची मोठी अडचण ठरणार आहे. भारतात फेसबुकच्या ग्रोथमध्ये आलेल्या कमतरतेची दोन मोठी कारणे सांगितली जात आहेत.

Facebook : भारतातून फेसबुकचा बाजार उठणार? मेटाच्या अंतर्गत रिसर्चमध्ये समोर आली धक्कादायक माहिती...
मेटा, फेसबुक
Image Credit source: tv9
Follow us on

मेटाच्या (Meta) मालकीच्या फेसबुकची भारतातील ग्रोथ घसरली आहे. मेटा कंपनीच्या इंटरनल रिसर्चमध्ये ही बाब समोर आलेली असून त्यामुळे भारतातील फेसबुकचे मार्केट चिंताजनक परिस्थितीमध्ये पोहचले आहे. भारतात मेटाच्या फेसबुक, इंस्टाग्राम व्हाट्‌सॲपला मोठ्या संख्येने युजर्स आहेत. भारताची लोकसंख्या पाहता सोशल मीडियासाठी भारत एक मोठे मार्केट म्हणून जगात समोर आले आहे. अशा परिस्थितीमध्ये फेसबुकच्या (Facebook) लोकप्रियतेमध्ये घट होणे ही मेटासमोरची मोठी अडचण ठरणार आहे. भारतात फेसबुकच्या ग्रोथमध्ये आलेल्या कमतरतेची दोन मोठी कारणे सांगितली जात आहेत, त्यात, पहिले म्हणजे वाढत असलेली न्यूडिटी तर दुसरे कारण महिलांच्या सुरक्षा आणि प्रायव्हसीबाबत सांगण्यात येत आहे. मेटाच्या दुसऱ्या कंपन्या व्हाट्‌सॲप व इन्स्टाग्रामच्या (Instagram) तुलनेमध्ये फेसबुकची ग्रोथ कमी होत आहे. फेसबुकने पहिल्यांदा कुठल्यातरी क्वार्टरमध्ये घसरण पाहिली आहे. फेसबुकच्या फाइनेंस चीफ यांच्या मते, जास्त मोबाइल डेटा कॉस्टदेखील फेसबुकच्या ग्रोथमध्ये आलेल्या घसरणीचे एक मोठे कारण आहे.

महिलांच्या सुरक्षेबाब मोठी चिंता

मेटाच्या अंतर्गत रिसर्च रिपोर्टमध्ये समोर आले आहे, की महिलांचे फेसबुकबाबत असलेल्या निरुत्साहाचे मोठे कारण म्हणजे त्यांची सुरक्षा आणि प्रायव्हसी आहे. हे कारण याआधी देखील रिपोर्टमध्ये समोर आले होते. रॉयटरच्या रिपोर्टनुसार, कंटेंट सेफ्टी आणि अनपेक्षित कॉनटेक्ट्‌स महिलांच्या फेसबुक बाबतच्या निरुत्साहाचे मोठे कारण आहे; आणि हेच फेसबुकच्या चिंतेचेही एक महत्वाचे कारण ठरत आहे. मेटाने आपल्या रिपोर्टमध्येही याबाबत कबुली दिली आहे, की महिलांना मागे ठेवून भारतात यश मिळवणे अशक्य आहे.

न्यूडिटी एक मोठी समस्या

मेटाच्या अंतर्गत रिसर्चमध्ये अजून एक मोठी बाब समोर आली आहे. या रिपोर्टनुसार, न्यूडिटी कंटेंट फेसबुकच्या ग्रोथमधील एक प्रमुख समस्या आहे. याच्या मागील कारण म्हणजे ॲप डिझाइन, स्थानिक भाषा आणि लिटरेसीची कमतरता आहे. कंपनीने हेदेखील मान्य केले आहे, की व्हिडिओ कंटेंट पाहिजे असलेले इंटरनेट यूजर्समध्ये अपिलची कमतरता आहे. रिसर्चनुसार, हे सर्वच कारणे फेसबुक समोर एक आव्हान म्हणून उभे राहिले आहेत.

हे सुद्धा वाचा

भारत एक मोठी बाजारपेठ

भारतातील लोकसंख्या बघता मेटाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हाट्‌सॲपसाठी भारत एक मोठी बाजारपेठ म्हणून समोर आली आहे. अशात सोशल मीडियाचा विचार केल्यास भारताला दुर्लक्ष करुन चालणार नाही, याची माहितीही मेटाला आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या देशात आपली ग्रोथ करण्यासाठी मेटाला या सर्व आव्हानांसाठी उपाय योजना करावी लागणार आहे.