Flipkart TV Days : बंपर डिस्काऊंटसह MI, Samsung, LG कंपनीचे स्मार्ट टीव्ही खरेदीची संधी

तुम्हाला जर स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवर तुमच्यासाठी आजपासून Flipkart TV Days सुरू झाला आहे.

Flipkart TV Days : बंपर डिस्काऊंटसह MI, Samsung, LG कंपनीचे स्मार्ट टीव्ही खरेदीची संधी
अक्षय चोरगे

|

Apr 04, 2021 | 4:39 PM

मुंबई : तुम्हाला जर स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवर (Flipkart) आजपासून फ्लिपकार्ट टीव्ही डेज (Flipkart TV Days) सेल सुरू झाला आहे. यामध्ये तुम्हाला हाय टेक्नोलॉजीसह स्मार्ट टीव्ही मिळू शकेल, तेही अगदी कमी किंमतीत. ग्राहकांना बंपर डिस्काऊंटसह चांगल्या फीचर्सनी सुसज्ज असे स्मार्ट टीव्ही खरेदी करता यावे यासाठी फ्लिपकार्टने आजपासून Flipkart TV Days Sale सुरु केला आहे. हा सेल 8 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. (Flipkart TV Days sale starts from 4th April; buy smart TV in cheap price, check discount offers)

क्रिकेट फीव्हर साजरा करण्याच्या उद्देशाने फ्लिपकार्ट या कमर्शियल वेबसाइटने ही विक्री सुरू केली आहे. यासाठी वेबसाइटवर त्यासंबंधीचे बॅनरही देण्यात आले आहे. त्यावर लिहिले आहे की, स्टेडियममध्ये बसून सामना पाहताना जी मजा येते ती मजा आता घरी बसूनही घेता येईल.

या ब्रँड्सवर तगड्या ऑफर्स

फ्लिपकार्टच्या या टीव्ही डेज सेलमध्ये तुम्हाला एमआय (Mi), सॅमसंग, (Samsung) रियलमी (Realme) आणि LG सारख्या मोठ्या ब्रँड्सकडून स्मार्ट टीव्हीवर जोरदार ऑफर देण्यात आल्या आहेत. बऱ्याच टेलिव्हिजन्सवर साडेतीन ते चार हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. जर आपण या सेलमध्ये 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही घेतला तर आपल्याला 14,999 रुपयांमध्ये हा टीव्ही मिळेल. ही त्याची सुरुवातीची किंमत आहे. उर्वरित स्मार्ट टीव्हींचे दर वेगवेगळ्या कंपन्या आणि त्यांच्या फीचर्सवर आधारित आहेत.

जर तुम्ही Mi 4A Pro स्मार्ट टीव्ही खरेदी करत असाल तर तुम्हाला या टीव्हीसाठी 14,999 रुपये मोजावे लागतील. सॅमसंग च्या 32 इंचांच्या HD Ready स्मार्ट टीव्हीची किंमत 16,490 रुपये इतकी आहे. तर LG च्या स्मार्ट टीव्हीसाठी तुम्हाला 16,999 रुपये मोजावे लागतील. तर Realme चा स्मार्ट टीव्ही 15,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Oneplus च्या 32 इंचांच्या स्मार्ट टीव्हीसाठीदेखील तुम्हाला 15,499 रुपये मोजावे लागतील.

50 इंचांच्या स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट

साधारणपणे 50 इंचांचे स्मार्ट टीव्ही थोडे महाग असतात. परंतु या सेलमध्ये तुम्हाला 50 इंचांचा स्मार्ट टीव्ही अवघ्या 35 हजार रुपयांहून कमी किंमतीत मिळेल. या सेलमध्ये 50 इंचांच्या Mi 4X Ultra HD (4K) स्मार्ट टीव्हीसाठी तुम्हाला 34,999 रुपये मोजावे लागतील. तर 50 इंचांच्या Vu Premium स्मार्ट टीव्हीची किंमत 36,999 रुपये इतकी आहे. Nokia Ultra HD स्मार्ट टीव्हीदेखील 37,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही Panasonic Ultra HD स्मार्ट टीव्ही खरेदी करत असाल, तर त्याची किंमत 35,999 रुपये इतकी आहे.

ICICI कार्ड धारकांना अतिरिक्त डिस्काऊंट

फ्लिपकार्ट वर सुरु असलेल्या टीव्ही डेज सेलमध्ये ICICI बँक कार्ड धारकांना अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताना आयसीआयसीआय बँकेच्या कार्डचा वापर केलात तर तुम्हाला 10% इंस्टंट डिस्काऊंट दिला जाईल. याद्वारे तुम्हाला स्मार्ट टीव्ही खरेदी करताना डबल फायदा मिळेल.

इतर बातम्या

दमदार कॅमेरा असलेल्या Vivo X60 series ची किंमत लीक, जाणून घ्या फीचर्स

मोबाईल फुटला, डिस्प्ले गेला, डोन्ट वरी, हा 7 हजाराचा स्मार्टफोन घ्या आणि निश्चिंत राहा

(Flipkart TV Days sale starts from 4th April; buy smart TV in cheap price, check discount offers)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें