आधी बनावट पत्त्यावर पार्सलची ऑर्डर, रिटर्नमध्ये कांदे, बटाट्यांची पॅकिंग; फ्लिपकार्टच्या टीम लीडरचे कारनामे

आधी बनावट पत्त्यावर पार्सलची ऑर्डर, रिटर्नमध्ये कांदे, बटाट्यांची पॅकिंग; फ्लिपकार्टच्या टीम लीडरचे कारनामे
फ्लिपकार्ट

वाजिद हा फ्लिपकार्ट कंपनीत टीम लिडर म्हणून काम करत होता. (Flipkart Team Leader Cheated company)

Namrata Patil

|

Feb 27, 2021 | 9:44 PM

नवी मुंबई : फ्लिपकार्ट कंपनीत टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने चक्क फ्लिपकार्ट कंपनीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कौपरखैराणे पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. वाजिद शकील मोमीन असे यातील मुख्य आरोपीचे नाव आहे. वाजिद हा फ्लिपकार्ट कंपनीत टीम लिडर म्हणून काम करत होता. (Flipkart Team Leader Cheated company)

फसवणूक कशी व्हायची?

मिळालेल्या माहितीनुसार, वाजीद हा फ्लिपकार्ट कंपनीत टीम लिडर म्हणून काम करायचा. तो कंपनीतून बनावट ग्राहकांच्या पत्त्यावर पार्सल मागवायचा. मात्र डिलेव्हरी बॉयला ग्राहकाचा पत्ता सापडायचा नाही. त्यानंतर वाजीद रिटर्न आलेले सर्व पार्सल त्याच्या घरी घेऊन जात. यानंतर त्यातील वस्तू काढून त्या बॉक्समध्ये साबण, कांदे, बटाटे यासारख्या इतर वस्तू ठेवायचा. या वस्तू ठेवल्यानंतर बॉक्स पुन्हा पॅकिंग करुन ते पुन्हा फ्लिपकार्ट कंपनीकडे पाठवत असे. या सर्व प्रकरणाची पोलिसांनी माहिती मिळाली होती.

यानंतर पोलिसांनी वाजीद यांच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे सॅमसंगचा एक फोन आणि अॅपलच कंपनीचा आय फोन 11 हे मोबाईल आढळून आले. या मोबाईलच्या बिलाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

11 ब्रँडेड मोबाईल जप्त

यानंतर पोलिसांनी वाजिद शकील मोमीन (24) याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी घणसोली या ठिकाणी ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 11 ब्रँडेड मोबाईल आढळून आले. शकील मोमीन हा त्याचे साथीदार संघपाल मोरे आणि जयंत उगले यांच्या साथीने संबधित गुन्हे करीत होता. या तिघांनाही कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 8 लाख 24 हजारांचा माल जप्त केला आहे. (Flipkart Team Leader Cheating company)

संबंधित बातम्या : 

नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाची आत्महत्या, पुरंदरमधील धक्कादायक घटना

सावधान! ते मुलींना समुद्र किनाऱ्यावर बोलवतात, टच करतात, शूट करतात, मुंबई सायबर सेलकडून भांडाफोड !

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें