होंडाचा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ‘प्रभुत्व’ गाजवण्याचा प्लॅन? जाणून घ्या

बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी होंडाने पूर्ण तयारी केली आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटमध्ये आपलं कौशल्य आजमावत आहेत. होंडाने ही स्पर्धा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. जे बाजारात येताच खळबळ उडवून देतील.

होंडाचा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रभुत्व गाजवण्याचा प्लॅन? जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Feb 11, 2025 | 2:01 PM

होंडाने यापूर्वीच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनालाही बरीच लोकप्रियता मिळाली आहे. अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक बाजारात दाखल होण्यापूर्वी होंडाने इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश केला होता. होंडाने यंदाच्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये दोन नवीन दुचाकी लाँच केल्या आहेत. होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आणि क्यूसी 1 या दोन्ही गाड्या बाजारात आल्या आहेत. याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

रिपोर्टनुसार, होंडा भारतात ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याची योजना आखत आहे, जो 2028 मध्ये सुरू होऊ शकतो.

होंडा लाँच करणार 10 नवीन इलेक्ट्रिक वाहने

होंडाने पुढील 5 वर्षांची तयारी केली आहे. येत्या 5 वर्षांत कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करणार आहे. होंडा भारतात 10 नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याची शक्यता आहे. यापैकी चार वाहने येत्या दोन वर्षांत लाँच केली जाऊ शकतात. होंडा आपल्या वाहनांच्या निर्मितीसाठी भारतात प्लांट उभारणार आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहून कंपनीने हा निर्णय घेतला आहे. येत्या काही वर्षांत भारत ईव्ही हब बनू शकतो, असा कंपनीचा विश्वास आहे. त्यामुळे भविष्यात कंपनीने मोठे लक्ष्य ठेवल्याचे दिसत आहे.

‘हे’ होंडाचे टार्गेट?
होंडा 2025 ते 2027 दरम्यान कोणती वाहने लाँच करणार आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनी दरवर्षी 4 मॉडेल्स बाजारात लाँच करू शकते. यामुळे तीन लाख युनिट्सच्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवले जाऊ शकते. होंडाचे लक्ष्य नवीन वाहनांच्या विक्रीशी संबंधित असू शकते.

होंडाची इलेक्ट्रिक स्कूटर्स
होंडाने अ‍ॅक्टिव्हा इलेक्ट्रिक आणि क्यूसी 1 बाजारात आणून आपल्या भव्य योजनेची सुरुवात केली आहे. कंपनीने ही मॉडेल्स मर्यादित फीचर्ससह आणली आहेत. पण आगामी नवीन मॉडेल्स अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह येऊ शकतात.

होंडाने 5 वर्षांची तयारी केली
भारतात 10 नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्याची शक्यता आहे. होंडाने येत्या 5 वर्षांत कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करणार आहे. होंडा यापैकी चार वाहने येत्या दोन वर्षांत लाँच केली जाऊ शकतात. कंपनी दरवर्षी 4 मॉडेल्स बाजारात लाँच करू शकते. यामुळे तीन लाख युनिट्सच्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवले जाऊ शकते. होंडा भारतात ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याची योजना आखत आहे, जो 2028 मध्ये सुरू होऊ शकतो.