
२०२५ मध्ये स्मार्टफोन टेक्नॉलॉजीचा अस्सल धमाका पाहायला मिळणार आहे! Apple चा नवीनतम iPhone 16 Pro Max एकीकडे तयार आहे आपलं दबदबा कायम ठेवायला, तर अँड्रॉइड जगतात Samsung, Google, Xiaomi, Vivo आणि Oppo हे दिग्गज ब्रँड्स आपापले ‘killer’ flagship फोन्स घेऊन थेट मैदानात उतरलेत! यंदा निवड करणं खरंच कठीण होणार आहे, कारण दोन्ही गट अगदी तगड्या स्पेसिफिकेशन्ससह सज्ज आहेत. चला तर मग, पाहूया कोणते Android फ्लॅगशिप vs iPhone मध्ये नेमकं काय ?
गुगलचा कॅमेरा प्रो! या फोनमध्ये आहे नवीन Tensor G4 चिप, 6.8 इंचाचा जबरदस्त LTPO OLED डिस्प्ले, आणि खास AI क्षमतांनी युक्त सॉफ्टवेअर. 5x ऑप्टिकल झूम आणि 5060 mAh बॅटरी यामुळे हे डिव्हाईस फोटोग्राफी आणि परफॉर्मन्समध्ये सर्वोत्तम ठरतं.
Galaxy S मालिकेचा राजा परतलाय! 6.9 इंचाचा LTPO AMOLED 2X डिस्प्ले, 200MP कॅमेरा, 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि S Pen सपोर्ट यामुळे तो आयफोनच्या पुढे ठरत आहे. नवीन Snapdragon 8 Elite चिपसह 5000 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo कडून जबरदस्त फोकस आहे कॅमेरावर! 200MP Zeiss पेरिस्कोप कॅमेरा, 6000 mAh बॅटरी, आणि Dimensity 9400 प्रोसेसर यामुळे हा फोन फोटोग्राफर्ससाठी ‘dream tool’ ठरतो. यासोबत 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज ही एक अजोड गोष्ट आहे.
Oppo ने खास हॅसलब्लाडच्या सहकार्याने 50MP चा क्वाड-कॅमेरा बनवला आहे. त्याला साथ देतो 5910 mAh बॅटरीचा पॉवरहाऊस आणि 6.78 इंचाचा 120Hz LTPO AMOLED डिस्प्ले. Dimensity 9400 प्रोसेसरसह Satellite सपोर्ट याला वेगळं बनवतो.
शाओमीचा प्रीमियम गेम अजूनच मजबूत झाला आहे. 200MP Leica परिस्कोप कॅमेरा, 5410 mAh बॅटरी, 1TB स्टोरेज आणि Satellite Communication हे सगळं मिळून हा फोन ‘फुल पॅकेज’ ठरतो. 6.73 इंचाचा AMOLED स्क्रीन आणि नवीनतम Snapdragon चिपमुळे परफॉर्मन्स सॉलिड!
Apple चा ब्रँड व्हॅल्यू, iOS चं स्मूथ अनुभव आणि टॉप-नोच बिल्ड क्वालिटी ही त्याची ओळख. पण यंदा Android फ्लॅगशिप्सने प्रत्येक फ्रंटवर टक्कर देणारे हत्यारं बाहेर काढली आहेत – मग तो कॅमेरा असो, बॅटरी, स्क्रीन की AI!