JIOचा नवा धमाका, फक्त 50 रुपयांत महिन्याभराच्या डेटाचं टेन्शनच संपणार, नेमका प्लान काय?
कोणत्याही प्लानला रिचार्ज करण्याआधी तुम्ही MyJio ऐप्ल वा कंपनीच्या अन्य रिचार्ज माध्यमांवर या पॅकची उपलब्धता आणि तुमच्या नंबरचा पात्रता अवश्य चेक करा...

जर तुमचा दिवस संपायच्या आत डेटा संपत असेल आणि वारंवार डेटा रिचार्ज करावा लागत असेल तर ही समस्या आता दूर होऊ शकते. जिओने एक असा प्लान बाजाारात आणला आहे. जो डेटा संपण्याची समस्येपासून बऱ्याच प्रमाणात दिलासा देऊ शकतो. हा प्लान त्या लोकांसाठी उपयुक्त आहे जे रात्रीचे चित्रपट आणि वेबसिरीज पाहू इच्छीतात किंवा मोठ्या फाईल डाऊनलोड करत असतात किंवा मोबाईलवर गेम खेळतात. जिओच्या या ५० रुपयांच्या डेटा पॅकमध्ये रात्रीच्या वेळी पाच तासांचा अनलिमिटेड इंटरनेट वापरण्याचा फायदा मिळतो.या प्लानची खास बाब म्हणजे युजर्सना ही सुविधा केवळ एक दिवसासाठी नव्हे तर संपूर्ण २८ दिवसांपर्यंत मिळते.
या पॅकच्या मदतीने युजर्स आपल्या दरदिवशी मिळणाऱ्या डेटाला वाचवू शकतात. म्हणजे दिवसा इंटरनेटच्या वापर करण्यासाठी तुमच्याकडे डेली रिचार्ज प्लानचा डेटा राहिल आणि रात्रीच्या वेळी जास्त डेटा खर्च करण्यासाठी हा वेगळा पॅक तुमच्या कामी येईल.
Jio च्या 50 रुपयांच्या पॅकमध्ये काय मिळेल
जिओ च्या या डेटा पॅकमध्ये दर दिवशी रात्री १२ वाजता ते सकाळी ५ वाजेपर्यंत अनलिमिटेड इंटरनेटचा फायदा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. त्यामुळे युजर्सना सतत चार आठवड्यांपर्यंत रोज रात्री पाच तासांचा अतिरिक्त डेटाचा वापर करण्याची संधी मिळते. या दरम्यान, मोठी फाईल डाऊनलोड करायची असेल, चित्रपट पाहायचा असेल, गेम डाऊनलोड करायचा असेल आणि मोबाईल ऐप्स अपडेट करणे अशी कामे सहज करता येतील . या एक्टिव्हीटीसाठी दर दिवशी मिळणारा डेटा वापरण्याची गरज लागणार नाही. खास करुन त्या लोकांना या सेवेचा फायदा होतो,ज्यांचा रोजचा डेटा नेहमी व्हिडीओ पाहताना किंवा डाऊनलोडिंग करताना संपतो.
हा डेटा पॅक 4G आणि 5G नेटवर्कवर काम करतो. परंतू या पॅकचा फायदा तुमच्या भागातील नेटवर्कची उपलब्धता आणि वापरला जाणारा डिव्हाईसवर अवलंबून आहे. येथे लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे अनलिमिटेड डेटाची सुविधा केवळ रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंतच आहे. यानंतर इंटरनेट वापरले तर तुमच्या मेन रिचार्ज प्लानचा डेटाचा वापर करावा लागत आहे.
कोणत्या लोकांसाठी रिचार्ज ?
हा पॅक प्रत्येक युजरसाठी गरजेचा नाही.परंतू ज्या लोकांना रात्री इंटरनेट गरज असते. त्या लोकांना हा प्लान चांगला आहे. स्टुडट्सना रात्री अभ्यास करायचा असेल. फाईल डाऊनलोड करायच्या असतील. तसेच गेमिंग आणि मुव्ही पाहण्याचे जे शौकीन असतील तेच हा प्लान घेऊ शकतील. ज्या लोकांना दिवसा नेटची गरज आहे त्यांच्यासाठी हा प्लान उपयोगाचा नाही. हा संपूर्ण दिवस चालणाऱ्या इंटरनेट प्लानला अनलिमिटेड डेटा प्लान हा पर्याय नाही.
Jio चा 15 आणि 25 रुपयांचा डेटा पॅक
Jio कडे 50 रुपयांसह 15 आणि 25 रुपयांचा डेटा ऐड ऑन पॅक देखील उपलब्ध आहे. कंपनीच्या 15 रुपयेवाल्या पॅकमध्ये एक दिवसांसाठी 5G डेटा मिळतो. तसेच 25 रुपयांचा पॅक देखील अतिरिक्त इंटरनेट डेटाची गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे.