सावध व्हा… व्हाट्सॲप हॅक करण्याचा चोरट्यांचा नवीन फंडा… मोबाईल डाटासह बँक खाते होईल रिकामे

| Updated on: May 27, 2022 | 11:02 AM

व्हाट्सॲपच्या मदतीने मोबाईल हॅक करता येणार आहे. या नवीन हॅकिंगबाबत क्लाउडेस्क डॉट कॉमचे संस्थापक राहुल सासी यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे, की सायबर गुन्हेगार ओटीपीला ॲक्सेस करुन हे गुन्हेगारी कृत्य करत आहेत.

सावध व्हा... व्हाट्सॲप हॅक करण्याचा चोरट्यांचा नवीन फंडा... मोबाईल डाटासह बँक खाते होईल रिकामे
सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलसह बँक खाते हॅक (hacked) करुन ते रिकामे करु शकणार आहेत.
Follow us on

व्हाट्सॲपचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आता व्हाट्सॲपबाबत एक नवीन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या नवीन पर्यायाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार तुमचा मोबाईलसह बँक खाते हॅक (hacked) करुन ते रिकामे करु शकणार आहेत. व्हाट्सॲपच्या (WhatsApp) मदतीने मोबाईल हॅक करता येणार आहे. या नवीन हॅकिंगबाबत क्लाउडेस्क डॉट कॉमचे संस्थापक राहुल सासी यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे, की सायबर गुन्हेगार (Cyber criminals) ओटीपीला ॲक्सेस करुन हे गुन्हेगारी कृत्य करत आहेत. सासी यांच्या मते, सायबर गुन्हेगार व्हाट्सॲप अकाउंटला टेकओव्हर करण्यासाठी एकदम साध्या पध्दतींचा वापर करीत आहेत. ज्याकडे, जास्तकरुन लोक दुर्लक्ष करीत असतात. सासी यांनी याबाबत आपल्या ट्‌वीटर पोस्टवर सविस्तर माहिती दिली आहे.

काय आहे व्हाट्‌सॲप ओटीपी स्कॅम

कोणाचेही व्हाट्‌सॲप हॅक करण्यासाठी सायबर गुन्हेगार संबंधित व्यक्तीला एक नंबर डायल करण्यासाठी भाग  पाडतात. जो नंबर *67<10 digit number> किंवा 405<10 digit number> असू शकतो. एखाद्या व्यक्तीने हा नंबर नुसता डायल जरी केला तरी संबंधित व्यक्ती सायबर गुन्हेगाराच्या सिस्टीममध्ये लॉगइन करते. आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्‍न निर्माण झाला असेल, की नुसता नंबर डायल केला तरी सायबर गुन्हेगार संबंधित ओटीपी कसा माहित करुन घेतात?, याचे उत्तर पुढील मुद्द्याच्या आधारे समजून घेउ.

असा वाचला जातो ओटीपी

ओटीपी वाचण्यासाठी सायबर गुन्हेगार रिलायंस जिओ किंवा एअरटेलच्या सर्व्हिस रिक्वेस्ट सेवांचा चुकीचा फायदा येत असतात. यात ते डायल फॉरवर्ड सेवांचा वापर करतात, जे फोन कॉल व्यस्त असल्यावर कॉल फॉरवर्ड करण्याच्या सुविधा देत असतात. सायबर गुन्हेगार हॅकिंगच्या दरम्यान, युजर्सच्या कॉलला बिझी ठेवतात. त्यानंतर ओटीपी फोन कॉलच्या माध्यमातून मागितला जात असतो. नंतर फॉरवर्ड कॉलच्या माध्यमातून ओटीपी सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहचतो.

जगभरात होताय हॅकिंगचे प्रकार

सासी यांनी सांगितले, की जगभरातील देशांमधील टेलीकॉम कंपन्या अशा प्रकारच्या सेवा देत असतात. त्यामुळे या माध्यमातून सायबर गुन्हेगारांना आपले गुन्हेगारी कृत्य करणे फावते. व्हाट्‌सॲप लॉगइन करण्यासाठीही व्हेरिफिकेशन्सची आवश्‍यकता असते. ज्यांतर्गत 6 नंबरचा कोड एंटर केल्यानंतर युजर्सचे अकाउंट व्हेरिफाई होत असते.