
मोटोरोला कंपनीने त्यांचा नवीन फोन, मोटो जी पॉवर 2026 निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये लाँच केला आहे. हा फोन मोटो जी पॉवर (2025) चा सक्सेसर आहे. ज्यामध्ये काही छोटे पण महत्त्वाचे अपग्रेड आहेत. कंपनीने हा फोन देखील आधीच्या मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरसह ग्लोबल मार्केटमध्ये सादर केला आहे. फोनमध्ये 120 हर्ट्झ डिस्प्ले, 50 एमपी ओआयएस कॅमेरा आणि 5200एमएएच बॅटरी आहे. चला त्याची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये आजच्या लेखात जाणून घेऊयात…
मोटो जी पॉवर (2026): किंमत
मोटो जी पॉवर (2026) ची किंमत अमेरिकेत $299.99 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 27,100 रूपये आहे. कॅनडामध्ये त्याची किंमत कॅनेडियन डॉलर्स 449.99 अंदाजे 29,550 रूपये आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह फक्त एकाच प्रकारात उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन 8 जानेवारीपासून इव्हनिंग ब्लू आणि प्युअर काश्मिरी रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होईल.
मोटो जी पॉवर (2026): स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.8 इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. स्क्रीनमध्ये उच्च ब्राइटनेस मोड आहे जो 1000 निट्स पर्यंत ब्राइटनेस पोहोचू शकतो. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7आय डिस्प्लेचे संरक्षणही देण्यात आलेलं आहे. सुधारित ऑडिओ अनुभवासाठी, यात डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह स्टीरिओ स्पीकर्स आहेत.
मोटो जी पॉवर (2026): चिपसेट आणि स्टोरेज
मोटो जी पॉवर (2026) मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, जो 8 जीबी रॅमसह येतो. फोनमध्ये 128 जीबी बिल्ट-इन स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबी पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर चालतो, जो वापरकर्त्यांना नवीनतम सॉफ्टवेअर अनुभव प्रदान करतो.
मोटो जी पॉवर (2026): कॅमेरा आणि बॅटरी
यात ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Moto G Power (2026) मध्ये 5200 mAh ची बॅटरी आहे जी 30W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यात 3.5mm जॅक, NFC आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.