Motorola चा नवीन Tablet बाजारात, Realme Pad, Samsung Tablet ला टक्कर

| Updated on: Jan 18, 2022 | 4:52 PM

मोटोरोलाने (Motorola) भारतात आपले नवीन प्रोडक्ट लॉन्च केले आहे, ज्याचे नाव Motorola Moto Tab G70 असे आहे. हा एक टॅबलेट (Tablet) आहे आणि रियलमी पॅड आणि सॅमसंग टॅब्लेटशी स्पर्धा करेल.

Motorola चा नवीन Tablet बाजारात, Realme Pad, Samsung Tablet ला टक्कर
Moto G70 Tab (Photo source: www.motorola.com.br/)
Follow us on

मुंबई : मोटोरोलाने (Motorola) भारतात आपले नवीन प्रोडक्ट लॉन्च केले आहे, ज्याचे नाव Motorola Moto Tab G70 असे आहे. हा एक टॅबलेट (Tablet) आहे आणि रियलमी पॅड आणि सॅमसंग टॅब्लेटशी स्पर्धा करेल. Moto Tab G70 च्या प्रमुख फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 2K डिस्प्ले, क्वाड स्पीकर आणि अनेक चांगले स्पेक्स मिळतील. या टॅबची सुरुवातीची किंमत 21,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. यात मीडियाटेक हेलिओ प्रोसेसर आणि क्वाड स्पीकर्स आहेत, जे डॉल्बी अॅटमॉससह येतात.

Moto Tab G70 बद्दल बोलायचे तर, हा एक हाय-एंड टॅबलेट आहे, जो गेमिंग आणि इतर गोष्टींसाठी देखील वापरला जाऊ शकतो. युजर्स व्हिडिओ आणि गेमिंगसाठी देखील याचा वापर करू शकतात.

Motorola Moto Tab G70 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola च्या या लेटेस्ट टॅबलेटबद्दल बोलायचे झाले तर, यात 11 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 2K (2 हजार रिझोल्यूशन) सह येतो. यात पातळ बेझल्स आहेत, जे टॅब्लेटला आकर्षक लुक देतात. तसेच, त्यात एज टू एज व्ह्यूचा अँगल देण्यात आला आहे. हा टॅबलेट एचडी सर्टिफिकेशनसह येतो, जो Amazon आणि Netflix सारख्या स्ट्रीमिंग अॅप्सना सपोर्ट करतो.

Motorola Moto Tab G70 ची बॅटरी

मोटोरोलाच्या या टॅबलेटमध्ये 7700 mAh ची बॅटरी दिली आहे, जी टॅबलेटला मजबूत बॅटरी बॅकअप देण्यास मदत करेल. याशिवाय, यामध्ये MediaTek Helio G90T ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये युजर्सना 4 जीबी रॅम मिळेल. तसेच यामध्ये 64 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. आवश्यक असल्यास युजर्स यामध्ये 1 टीबी पर्यंत एसडी कार्ड जोडू शकतात.

Motorola Moto Tab G70 चा कॅमेरा

Motorola Moto Tab G70 च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे, तर 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जातो. यात क्वाड स्पीकर सिस्टम आहे, जी डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करते.

Moto Tab G70 ची किंमत आणि ऑफर्स

Moto G70 फ्लिपकार्टवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 21,999 रुपये आहे. हा टॅब सिंगल कलर आणि स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. कंपनी हा टॅब ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर फक्त 24,249 रुपयांमध्ये देत आहे.


इतर बातम्या

Honor च्या फोल्डेबल स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरु, जाणून घ्या Magic V ची किंमत आणि फीचर्स

Republic Day Sale: TCL च्या किफायतशीर स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट, पाहा यादी

OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Motorola Moto Tab G70 launched in India, know price and features)