AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold ATM: पैसे नाही, बाहेर पडते खरेखुरे सोने! दुबईतील गोल्ड एटीएमची जगभर चर्चा, काम करते कसे?

Dubai Gold ATM : दुबईत असे काही एटीएम मशीन आहेत, जिथून पैसे नाही तर सोने बाहेर पडते. हे एटीएम मशीन कसे काम करते हे तुम्हाला माहिती आहे का? ही मशीन का बसवण्यात आली आहे. त्याची सुरक्षा असते कशी?

Gold ATM: पैसे नाही, बाहेर पडते खरेखुरे सोने! दुबईतील गोल्ड एटीएमची जगभर चर्चा, काम करते कसे?
दुबई गोल्ड एटीएम
| Updated on: Sep 27, 2026 | 3:00 PM
Share

Dubai Gold ATM : दुबई ही मायानगरी आहे. गगनचुंबी इमारती, जगभरातील नागरिकांची गर्दी, शॉपिंगचा खास अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान यामुळे दुबईकडे अनेकांची पावलं वळतात. दुबईला मध्यपूर्वेतील शॉपिंग कॅपिटल उगीच म्हटले जात नाही. जगभरातील पर्यटक, नागरिकांची इथं तोबा गर्दी उसळलेली असते. आता या शहरात सोने देणारी एटीएमही उभारण्यात आली आहे. त्यातून पैसे नाही तर सोने बाहेर येते. गोल्ड टू गो नावाचे हे गोल्ड एटीएम बुर्ज खलिफा आणि अटलांटिस द पाम सारख्या ठिकाणी बसवण्यात आलं आहे. या मशिनमधून ग्राहकांना सोन्याचे शिक्के, सोन्याचा ठोकळा, पट्टी मिळते. कार्ड अथवा रोख, नगद पैसे देऊन अवघ्या मिनिटात 24 कॅरेट सोने एटीएमच्या बाहेर येते.

गोल्ड एटीएम कसे काम करते?

गोल्ड एटीएमवर टचस्क्रीन देण्यात आलेली आहे. ग्राहकांना त्यावर सोने खरेदीचा पर्याय दिसतो. तुम्हाला सोन्याची पट्टी वा, ठोकळा, नाणे काय खरेदी करायचे याचा पर्याय समोर येतो. वेगवेगळ्या वजनात हे सोने मिळते. तर डिझाईननुसार सोन्याची खरेदी करता येते. तुम्ही एकदा पर्याय निवडल्यानंतर एटीएम मशिनवर त्याची किंमत दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारातील गोल्ड मार्केटच्या किंमतीनुसार, प्रत्येक 10 मिनिटाला या किंमती अपडेट होतात. त्यानुसार ग्राहकांना सोन्याची खरेदी करता येते.

प्रत्येक 10 मिनिटाला सोन्याची किंमत होते अपडेट

या मशीनचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे सोन्याची बदलती किंमत ही आहे. जागतिक सोने बाजारानुसार येथील भावफलक हलता असतो. प्रत्येक 10 मिनिटाला या किंमती बदलतात. म्हणजे ग्राहकांना बदलत्या किंमतीनुसार सोने खरेदी करता येते. अर्थात भाव कमी जास्त असू शकतो. वजनानुसार, ग्राहकांना किंमत मोजावी लागते. त्यानंतर गोल्ड एटीएम मशीनमधून सोने बाहेर येते.

क्रेडिट-डेबिट कार्डने पेमेंट करता येते?

हे गोल्ड एटीएम मशीन अनेक प्रकारच्या पेमेंट पर्यायांना स्वीकारते. ग्राहक क्रेडिट अथवा डेबिट कार्डपासून इतर पेमेंट करू शकतात. स्थानिक चलनात रोख रक्कम भरूनही सोने खरेदी करता येते. ग्राहकाला या मशिनमधून 24 कॅरेट सोने मिळते. त्यांना सोन्याची पट्टी वा, ठोकळा, नाणे डिझाईनसह खरेदी करता येते.

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा