OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

OnePlus ने शुक्रवारी संध्याकाळी भारतात एका वर्चुअल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कंपनीने OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 हे दोन प्रोडक्ट्स सादर केले आहेत.

OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Oneplus 9rt (फोटोः oneplus.in/)

मुंबई : OnePlus ने शुक्रवारी संध्याकाळी भारतात एका वर्चुअल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कंपनीने OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 हे दोन प्रोडक्ट्स सादर केले आहेत. यातल्या OnePlus 9RT या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट वापरण्यात आला आहे. यात LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेज आहे. हा फोन Android 11 आधारित Oxygen 11 OS वर काम करतो.

OnePlus 9RT ची किंमत किती असेल याचा खुलासा 17 जानेवारीला होईल, तर रेड केबल क्लब मेंबर्ससाठी 16 जानेवारीलाच हा फोन उपलब्ध होईल. Axis Bank कार्डधारकांना या फोनवर 4000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल. तसेच या ऑफर अंतर्गत वनप्लस बँड 999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो, तर वायरलेस Z बेस एडिशन 26 जानेवारीपर्यंत 1499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तुम्ही OnePlus Buds Z2 वायरलेस इयरबड्स 4999 रुपयांना खरेदी करू शकता.

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9RT च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर, यात मॅट ग्लास पॅनल आहे, जो फ्रंट आणि बॅक पॅनल वर आहे. हा 198.5 ग्रॅम वजनाचा फोन आहे. या डिव्हाईसमध्ये 6.62 इंचांचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यामध्ये डाव्या बाजूला पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

OnePlus 9RT चा प्रोसेसर

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेटसह येतो. तसेच हा फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेजसह येतो. यात 4500 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 65W फास्ट चार्जिंगसह येते.

OnePlus 9RT चा कॅमेरा सेटअप

OnePlus 9 RT मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, जो सोनी सेन्सरसह येतो. तर सेकेंडरी कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा आहे, जो अल्ट्रा वाइड लेन्ससह येतो. यातील तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो सोनी सेन्सरसह येतो.

OnePlus Buds Z2 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

OnePlus Buds Z2 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ANC (अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन) साठी 11 मिमी ड्रायव्हर्स आणि 3 मायक्रोफोन आहेत. यात 40 mAh बॅटरी आहे, जी 7 तासांचा बॅटरी बॅकअप देते.

इतर बातम्या

Baby Shark Doo Doo | तब्बल 10 बिलियन Views घेणारा पहिला YouTube Video, असं काय ग्रेट आहे काय व्हिडीओत?

मीशू, एमएक्स प्लेअर, ते फ्री फायरपर्यंत; जाणून घ्या भारतातील सर्वात प्रसिद्ध अॅप्स

10000mAh बॅटरीसह येणारे टॉप 4 स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये ढासू बॅकअप

Published On - 4:14 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI