AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 की 6… अजित पवारांसोबत विमानात किती लोकं होती? अखेर मोठं सत्य समोर; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आकडा

Ajit Pawar Death : अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. अनेकांनी या विमानात 6 जण प्रवास करत होते, मग 5 लोकांचेच मृतदेह का सापडले असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

5 की 6... अजित पवारांसोबत विमानात किती लोकं होती? अखेर मोठं सत्य समोर; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आकडा
Ajit Pawar Plane CrashImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 04, 2026 | 6:09 PM
Share

अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर उरतण्याच्या काही मिनिटे आधी अजित दादांचे विमान कोसळून मोठा स्पोट झाला. या अपघातात विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. अनेकांनी या विमानात 6 जण प्रवास करत होते, मग 5 लोकांचेच मृतदेह का सापडले असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच काही नेत्यांनी हा अपघात नसून घातापात आहे असा आरोप करत या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशातच आता या विमानात नेमके किती लोक होती याची माहिती समोर आली आहे. या प्रश्नावर एका प्रत्यक्षदर्शीने विमानात नेमके किती लोक होते याची माहिती दिली आहे.

विमानात 6 लोक असल्याचा अनेकांचा संशय

अजित पवार यांचा अपघात झाल्यापासून या विमानात किती लोक होते याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या विमानात 5 लोकं होते. यात दोन पायलट, अजित पवार, एक एअर होस्टेस आणि अजित पवार यांचे अंरक्षक होते अशी माहिती विमान कंपनीने दिली आहे. मात्र काही नेत्यांनी या विमानात 6 लोक असल्याचा दावा केला जात आहे. आता प्रत्यक्षदर्शी आणि गोजुबावी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

कल्याण आटोळे म्हणाले की, विमान 8.35 ते 8.40 च्या आसपास गावाच्या बाजूने घिरट्या घालून आलं आणि त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते एका बाजूला झुकले आणि धावपट्टीजवळ कोसळले. विमान पडल्यानंतर मी तिथे पोहोचलो. त्यावेळी एक निळी पॅन्ट असलेला माणूस विमानातून उतरायचा प्रयत्न करत होता, म्हणजे त्याचा पाय बाहेर होता आणि दरवाजा थोडा उघडलेला होता असं मला जाणवलं. त्याचवेळी गावातील एकाने मला सांगितलं की सरपंच पुढे येऊ नका स्फोट होऊ शकतो, त्यामुळे मी मागे सरलो आणि विमानाचा मोठा स्फोट झाला.

विमानात 5 लोक

पुढे बोलताना कल्याण आटोळे म्हणाले की, ‘विमानाच्या स्पोटानंतर मी डावीकडे गेलो, तिथे एक बॉडी पडली होती. त्यावेळी किरण गुजर आले आणि त्यांनी सांगितलं की हे अजित दादांचे विमान आहे आणि हे दादा आहेत. मात्र आमचा त्यावर विश्वास बसला नाही. उजव्या बाजूला दादांचे अंगरक्षक पडलेले होते. आतमध्ये 3 लोक होते. आम्ही ट्रॅक्टरने विमान तोडून आतील लोक बाहेर काढले. म्हणजे आतमध्ये पाचच लोक होते. दादा, त्यांचे अंगरक्षक आणि आतील 3 लोक असे पाच लोक होते.’

Follow Us
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती