मीशू, एमएक्स प्लेअर, ते फ्री फायरपर्यंत; जाणून घ्या भारतातील सर्वात प्रसिद्ध अॅप्स

मोबाईल वापरकर्त्यांने इन्स्टाग्राम (Instagram), यूट्यूब (Youtube), एमएक्स टकाटक, मीशू, फ्री फायर आणि लूडो किंग अशा अॅप्सचा वापर केला आहे. अॅप एनीने केलेल्या सर्व्हेमध्ये वापकरर्त्यांचा स्वभाव, वापरलेले अॅप्स तसेच सर्वात जास्त डाऊनलोड करण्यात आलेले अॅप याचा अभ्यास केला आहे.

मीशू, एमएक्स प्लेअर, ते फ्री फायरपर्यंत; जाणून घ्या भारतातील सर्वात प्रसिद्ध अॅप्स
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 1:49 PM

मुंबई : भारतीय स्मार्टफोन यूजर्स वेगवेगळ्या अॅप्सचा वापर करतात. मात्र भारतीय लोक जास्त वेळ कोणत्या अॅपवर घालवतात हे शोधण्यासाठी अॅप एनी (App Annie) या संस्थेने सर्व्हे केला आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एका भारतीयाने 2021 मध्ये दिवसभारातील साधारणत: 4.7 तासाचा वेळ मोबाईलवर घालवलेला आहे. या काळात मोबाईल वापरकर्त्यांने इन्स्टाग्राम (Instagram), यूट्यूब (Youtube), एमएक्स टकाटक, मीशू, फ्री फायर आणि लूडो किंग अशा अॅप्सचा वापर केला आहे. अॅप एनीने केलेल्या सर्व्हेमध्ये वापकरर्त्यांचा स्वभाव, वापरलेले अॅप्स तसेच सर्वात जास्त डाऊनलोड करण्यात आलेले अॅप याचा अभ्यास केला आहे.

फ्री फायर गेमचा बोलबाला 

गेमिंग अॅप्सबाबत बोलायचं झालं तर 2021 साली भारतात वापरकर्त्यांनी फ्री फायर या गेमवर जास्त वेळ घातलेला आहे. त्यानंतर कॉल ऑन ड्यूटी, कॉईन मास्टर, कँडी क्रश, War: Battle Game, अशा गेम्समध्येही लोकांनी जास्त वेळ घातलेला आहे. वापरकर्त्यांनी या गेम्सचे अॅप जास्त प्रमाणात डाऊनलोड केलेले आहे. या अॅप्सनंतर Genshin Impact, Evony आणि Match Masters अशा अॅप्सचा समावेश आहे.

FAU: G गेमलाही लोकांची पसंदी 

ब्रिड रेज रेस नावाच्या मोबाईल गेमदेखील भारतात अनेकांनी डाऊनलोड केलेला आहे. या गेमला दुसऱ्या देशातही चांगलीच पसंदी मिळालेली आहे. भारतात FAU: G आणि Legend Squad 3D अशा गेम्सनादेखील मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात आले आहे.

सोशल अॅप्समध्ये इन्स्टाग्राम पहिल्या नंबरवर

जगाचा विचार करायचा झाला तर टिकटॉक हे सोशल अॅपच्या रांगेत पाचव्या क्रमांकाचे सर्वात जास्त वापरण्यात आलेले अॅप आहे. मात्र भारतात टिकटॉक बंद असल्यामुळे फेसबुक या अॅपवर जास्त वेळ घालवला जातो.

फेसबुक, स्नॅपचॅट आणि मौज अॅप्स मोठ्या प्रमाणात डाऊनलोड

डाऊनलोडिंगच्या बाबतीत इन्स्टाग्राम या अॅपला सर्वात जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. त्यानंतर एमएक्स टकाटक, फेसबुक, स्नॅपचॅट आणि मौज या अॅप्सना लोकांनी डाऊनलोड केले आहे. डाऊनलोडिंगच्या बाबतीत व्हॉट्सअॅप आठव्या क्रमांकावर आहे.

कोरोना काळात ऑनलाईन स्ट्रिमिंग मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे या काळात स्ट्रिमिंग अॅप्सना चांगलीच पसंदी मिळाली. स्ट्रिमिंग अॅप्सच्या बाबतीत नेटफ्लिक्स या अॅपला 1 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलेले आहे. त्यानंतर डिज्नी प्लस हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ यांचा क्रमांक येतो.

इतर बातम्या :

OnePlus 9RT India Launch: वनप्लस आज लॉन्च करणार दोन नवे मोबाईल; दमदार फोनचे फिचर्स, किंमत काय ?

10000mAh बॅटरीसह येणारे टॉप 4 स्मार्टफोन, सिंगल चार्जमध्ये ढासू बॅकअप

5000mAh बॅटरी, Octa Core प्रोसेसरसह Tecno चा 6 हजारांच्या रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच, JioPhone Next ला टक्कर

know about top apps in india people spend daily 4 hours on mobile

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.