AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन गडकरी यांचं निवडणुकीवरील वक्तव्य चर्चेत,म्हणाले, जातीच्या नावाखाली तिकीट घेणारे..’

जातीच्या नावाखाली तिकीट घेणारे समाजातसाठी काही करत नसल्याचे भाष्य नितीन गडकरी यांनी केलं. निवडणुकीवरील वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नितीन गडकरी यांचं निवडणुकीवरील वक्तव्य चर्चेत,म्हणाले, जातीच्या नावाखाली तिकीट घेणारे..'
| Updated on: Sep 27, 2026 | 2:55 PM
Share

भारतात कोणत्याही निवडणुकीत जातीपातीचं गणित आधी बघितलं जातं. ज्या मतदारसंघात ज्या समाजातील मतदारांची संख्या अधिक असते, त्या समाजातील नेत्याला तिकीट देण्याची राजकीय पक्षाची रणनीती पाहायला मिळते. मागील अनेक वर्षांपासून जवळपास सर्व राजकीय पक्ष या रणनीतीनुसार निवडणुकीच्या काळात तिकीटाचं वाटप करतात असतात. याच पद्धतीवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जातीच्या नावाखाली तिकीट घेणारा नेता त्या समाजाचा विकास करत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री गडकरी या पद्धतीवर आसूड ओढले आहेत.

नागपुरात चर्मकार समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात नितीन गडकरी यांनी राजकीय निवडणुकीवर भाष्य केलं. नितीन गडकरी म्हणाले, ‘समाजाचा विकास हा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानातून होत असते. शिक्षणाचा संबंध कौशयाल्याशी आहे , शिक्षण हे कौशल्यपूर्ण असायला पाहिजे. कौशयल्यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे, आमच्या गावात साडी बनविण्याच कौशल्यपूर्ण काम महिला करतात. एक साडी मी हेमा मालिनी यांना दिली, आता त्या तिच साडी घालून या महिलांच्या कार्यक्रमाला येणार आहे. अनेक जण म्हणतात मी या जातीचा आहे. मला तिकीट द्या, पण तो समाजासाठी तिकीट घेतल्यावर काहीच करत नाही म्हणून समाजाच्या माणसालाच तिकीट मिळाली म्हणजे समाजाचा विकास होतो अस नाही’.

‘सरकारकडून जे आम्हाला तुमच्या समाजासाठी करता येतं, ते आम्ही नक्की करू. मात्र तुम्हाला समाजात चांगले नेतृत्व निर्माण करायचे आहे. पटवर्धन नावाच्या व्यक्तीने चपला बनविण्याचा व्यवसाय थाटला, तो मोठा व्यवसाय करत आहे. आता ब्राम्हणपण चपला बनवायला लागले. तुमच्या समाजसोबत आमचं जुनं नात आहे. तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी साथ दिली आहे,असे त्यांनी सांगितले. तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. ‘देवेंद्रजी फडणवीस यांनी समृद्धी मार्ग बनविला, आता गाडी सुरू केल्यावर सरळ मुंबईला पोहचतो, असे गडकरी यांनी सांगितले. . संत रविदास महाराजांवर फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मी नितीन गडकरी यांचं आभार मानले की, त्यांनी त्यांच्या मातोश्रीच्या नावाने चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची सुरूवात 18 वर्ष पूर्वी केली आहे. सुरुवातीला या समाजातील जास्तीत जास्त मार्क मिळविणारे विद्यार्थी हे 80 ते 82 टक्के पर्यंत असायचे. आता ते 96 टक्के पर्यंत पोहचले. कोणताही व्यक्ती जन्माने मोठा होत नाही, तर तो ज्ञानाने होत असतो. त्यासाठी मन निर्मळ असायला पाहिजे, असा संदेश रविदास महाराज यांनी दिला आहे. गुरुग्रंथ साहेबमध्ये सुद्धा रविदास महाराज यांचे दोहे घेण्यात आले. जाती पाती पेक्षा माणसाची उन्नती कशी होईल हा विचार रविदास महाराज यांनी दिला. त्यांची जयंती आता सरकार मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यांचे विचार समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचविणार आहे’.

Follow Us
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा