फोन जुना, फीचर्स नवे, मोटोरोलाच्या ‘रेजर’चं रिलॉन्चिंग

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : सध्या स्क्रीन टच फोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही मोबाईल युझर्स सेल्फी आणि कॅमेरासाठी स्क्रीन टच फोनला आपली पहिली पसंती  देत आहेत. आज प्रत्येकजण टच स्क्रीनचा फोन वापरत आहे. अशामध्ये मोटोरोला आपला 14 वर्षापूर्वीचा जुना फोन पुन्हा लाँच करत आहे. Moto RAZR असं त्या फोनचं नाव आहे. जुनं ते सोनं म्हटले जाते. आजही […]

फोन जुना, फीचर्स नवे, मोटोरोलाच्या ‘रेजर’चं रिलॉन्चिंग
Follow us on

मुंबई : सध्या स्क्रीन टच फोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही मोबाईल युझर्स सेल्फी आणि कॅमेरासाठी स्क्रीन टच फोनला आपली पहिली पसंती  देत आहेत. आज प्रत्येकजण टच स्क्रीनचा फोन वापरत आहे. अशामध्ये मोटोरोला आपला 14 वर्षापूर्वीचा जुना फोन पुन्हा लाँच करत आहे. Moto RAZR असं त्या फोनचं नाव आहे.

जुनं ते सोनं म्हटले जाते. आजही अनेकांची पसंती नोकिया, सॅमसंग किंवा मोटोरोलाच्या जुन्या फोनवर असते. ते फोन छोटे होते, जरा क्लासिक लूक होता. यामुळे आजही ते पसंतीस उतरतात. नुकतेच नोकियानेही आपले दोन जुने फोन बाजारात पुन्हा लाँच केले आहेत आणि आजही तो फोन खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. Nokia 3310 आणि Nokia 8810 या दोन फोनला रिलाँच करण्यात आले.

आता मोटोरोलाही आपला 14 वर्षापूर्वीचा जुना फोन रिलाँच करण्याच्या तयारीत आहे. Moto RAZR असं त्या मॉडलचं नाव आहे. हा फोन जगातील सर्वात प्रसिद्ध फोनपैकी एक आहे. या फोनचा लूक जरी जुना असला, तरी या फोनमध्ये काही नवीन फीचर दिले आहेत. विशेष म्हमजे फ्लिप फोन म्हणून याला मोठ्या प्रमाणात मागणी येईल अशी शक्यातही वर्तवली जात आहे.

नुकतेच कंपनीने एका संस्थेत 17 डिसेंबर 2018 रोजी या फोनचं रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यामध्ये या जुन्या फोनची झलक दिसली आहे. 91 मोबाईलच्या रिपोर्टनुसार, यामध्ये फोल्ड होणारी स्क्रीन दिली आहे. एक स्क्रीन मोठी असेल तर एक स्क्रीन छोटी असेल.

मोटोरोला Moto Razer लाँच करण्याची तयारी सुरु आहे आणि याची किंमत 1500 डॉलर असेल त्यासोबतच या फोनमध्ये फोल्डेबल स्क्रीन असेल. हा स्मार्टफोन लिमीटेड एडिशनमध्ये आहे. कारण 1500 डॉलर किंमत पाहिली, तर भारतीय रुपयात एक लाखापेक्षा अधिक किंमत होत आहे. मात्र अजून कंपनीकडून ऑफिशिअल टीजर किंवा माहिती मिळालेली नाही.

नोकियाने जेव्हा अँड्रॉईड स्मार्टफोन लाँच केला होता तेव्हा Nokia 3310 पुन्हा लाँच केला. यानंतर Nokia 8810 ला रिलाँच केले होते. यामुळे मोटोरोला जरी जुना फोन लाँच करत असली तरी काही मोठी गोष्ट नाही.

आता लवकरच Moto Razer संबधित काही माहिती समोर येतील. 14 वर्षापूर्वीचा जुना फोन पुन्हा बाजारात येणार यामुळे मोबाईल युझर्स किती पंसती देतील हे महत्त्वाचे ठरणार आहे.