AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाही पगारवाढ नाही? मग ChatGPT च्या मदतीने शोधा की नोकरी, वापरली का ही ट्रिक सोपी

ChatGPT AI Tool : यंदा पण पगार वाढ न झाल्याने खट्टू झालात का? नोकरी बदलण्याचा विचार करत आहात का? मग चॅटजीपीटीचे एआय टूल तुमच्या उपयोगी पडेल. अवघ्या काही मिनिटात तुमचे काम सोपे होईल. नवीन नोकरी मिळवण्यासाठी चॅटजीपीटी असं उपयोगी ठरेल...

यंदाही पगारवाढ नाही? मग ChatGPT च्या मदतीने शोधा की नोकरी, वापरली का ही ट्रिक सोपी
अशी मिळवा नोकरी
| Updated on: Sep 03, 2024 | 4:44 PM
Share

तंत्रज्ञान आता झपाट्याने बदलत आहे. त्यात अमुलाग्र बदल झाला आहे. काही वर्षांपूर्वी AI Tool नोकरी मिळवण्यासाठी उपयोगी ठरेल, मदत करेल असे कोणी सांगितले तर ते शक्य वाटत नव्हतं. OpenAI चे ChatGPT टूल, Meta AI आणि Google Bard सारख्या एआय टूल्समुळे लोकांचे तासभराचे काम आता अवघ्या काही मिनिटांवर आले आहेत. अवघ्या काही मिनिटात तुमचे काम सोपे होईल. नवीन नोकरी मिळवण्यासाठी चॅटजीपीटी मदत करेल.  इतकंच नाही तर मुलाखतीसाठी काय तयारी करावी, कोणते प्रश्न महत्वाचे आहेत, यासंबंधीची माहिती पण मिळेल.  पण मुलाखतीत तुम्हाला तुमचा अनुभव आणि कसब पणाला लावावे लागणार आहे.

ChatGPT कशी करेल मदत?

Resume तयार करणे : चॅटजीपीटीच्या मदतीने तुम्ही आकर्षक आणि मुद्देसूद रिझ्यूम तयार करु शकता. पण त्यासाठी तुमच्या क्षेत्रातील कौशल्य आणि तुमचा अनुभव याची माहिती चॅटजीपीटीला द्यावी लागेल. त्या मदतीने एआय टूल तुमच्यासाठी एक खास रिझ्युमे तयार करेल.

मुलाखतीची तयारी : ChatGPT च्या मदतीने तुम्ही मुलाखतीची तयारी करु शकता. तुमच्या क्षेत्रात नेमक्या कोणते प्रश्न सर्वाधिक विचारण्यात येतात, याची उजळणी होईल. एआय टूल त्यासाठी तुमची मदत करेल.

नेटवर्किंगची सूचना : चॅटजीपीटी तुम्हाला तुमच्या क्षेत्रासंबंधीची माहिती आणि नेटवर्किंगची माहिती, टिप्स देईल. तुमचे लिंक्डइन प्रोफाईल, फेसबूक प्रोफाईल कसे आकर्षक आणि मुद्देसुद करायचे याची माहिती देईल.

करियरचा सल्ला : करियरबाबत अजूनही तुम्ही साशंक असाल, संभ्रम असेल तर चॅटजीपीटी तुम्हाला योग्य सल्ला देण्यास मदत करेल. तुमच्या अनुभवावरुन तुम्ही काय करायचे याची माहिती देईल.

कसा करावा अर्ज : ChatGPT तुम्हाला जॉब पोर्टलवर अर्ज कसा करावा. त्यासाठीच्या टिप्स देईल. नोकरी अर्जासाठी कोण कोणते कागदपत्र लागतात, या सर्वांची माहिती देण्यात येते. अर्थात चॅटजीपीटी तुम्हाला मदत करेल, पण तुम्हाला काय घ्यायचे आणि ती माहिती तुमच्या किती उपयोगाची ठरेल, याविषयीचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.