19000 रुपयांनी कमी किमतीत उपलब्ध आहे ‘हा’ फोन, कॅमेरा-प्रोसेसर सर्वकाही उत्तम

iPhone 16e, Vivo V40 Pro सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करणारा हा स्मार्टफोन आता स्वस्त झाला आहे. हा फोन त्याच्या लाँच किमतीपेक्षा 19001 रुपयांच्या कमी किमतीत खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. हा फोन कुठे खरेदी करता येईल आणि हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील? ते आपण आजच्या या लेखात जाणुन घेऊयात...

19000 रुपयांनी कमी किमतीत उपलब्ध आहे हा फोन, कॅमेरा-प्रोसेसर सर्वकाही उत्तम
OnePlus 12 Price
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 31, 2025 | 10:20 PM

जर तुम्ही OnePlus 12 5G खरेदी करण्याचा विचार करत असाल पण या फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत कमी होण्याची वाट पाहत असाल, तर योग्य संधी आली आहे. हा फोन लाँच किमतीपेक्षा 13001 रुपयांच्या स्वस्त किंमतीत विकला जात आहे, इतकेच नाही तर प्रोडक्टच्या सवलतीव्यतिरिक्त तुम्ही 6000 रुपयांच्या बँक कार्ड सवलतीचा लाभ देखील घेऊ शकता.

एकंदरीत, हा फोन लाँच किमतीपेक्षा 19001 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. सवलतीनंतर हा फोन कोणत्या किमतीत उपलब्ध आहे आणि हा फोन खरेदी करताना कोणत्या बँकेचे कार्ड पेमेंटवर अतिरिक्त सूट देईल ते आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत…

OnePlus 12 5G ची भारतात किंमत

OnePlus 12 5G या हँडसेटचा 16 जीबी रॅम/512 जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेला स्मार्टफोन अॅमेझॉनवर डिस्काउंटनंतर 56,998 रुपयांच्या किंमतीत विकला जात आहे. एचडीएफसी बँक आणि एसबीआय क्रेडिट कार्ड (ईएमआय) वर 6 हजार रुपयांच्या अतिरिक्त सूटचा फायदा घेत तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. फेडरल बँक कार्ड (EMI)वर 2 हजारांची सूट उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनशी होणार स्पर्धा

OnePlus ब्रँडचा हा स्मार्टफोन SAMSUNG Galaxy S24 + 5G किंमत 52,999), vivo V40 Pro 5G (किंमत 55,999), iPhone 14 (किंमत 54,999) आणि iPhone 16e (किंमत 54,900) या सर्व टॉपवर असलेल्या स्मार्टफोनशी स्पर्धा करणार आहे. कंपनीच्या साईट व्यतिरिक्त, तुम्हाला हे सर्व स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर मिळतील.

OnePlus 12 5G स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: वनप्लसच्या या स्मार्टफोनला 4500 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह 6.82 इंचाचा क्वाड एचडी प्लस फ्लुइड एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 वापरण्यात आला आहे.

चिपसेट: या हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 3 चिपसेट वापरण्यात आला आहे.

बॅटरी क्षमता: या फोनला पॉवर देण्यासाठी 5400 mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, जी 50 W वायरलेस आणि 100 W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा सेटअप: तर या फोनच्या मागील बाजूस 50 -मेगापिक्सेलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, 48 -मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा देखील उपलब्ध असेल. सेल्फी प्रेमींसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.