
नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी महत्वाची बामती आहे. ओप्पोने भारतात आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची रेटिंग आयपी 65 आहे, ज्यामुळे हा फोन पाणी आणि धुळीमुळे खराब होत नाही. महत्वाची बाब म्हणजे या फोनमध्ये 6000 एमएएच बॅटरी आणि 50 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. ओप्पोच्या या फोनचे नाव Oppo K13x 5G असे आहे. याची किंमत आणि फाचर्स जाणून घेऊयात.
Oppo K13x 5G ची वैशिष्ट्ये
ओप्पोच्या या फोनमध्ये 6.67 इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळतो जो 120 हर्ट्झ हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसे हा डिस्प्ले 1200 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 आय मिळेल. या फोनच्या डिस्प्लेमध्ये स्प्लॅश टच, ग्लोव्ह टच सारखे सपोर्ट देण्यात आले आहेत.
Oppo K13x 5G मध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. या फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. या फोनमध्ये एआय फीचर्स देखील देण्यात आली आहेत. हे एआय अनब्लर, एआय रिफ्लेक्शन रिमूव्हर, एआय रीइमेज सारख्या अनेक एआय एडिटिंग फीचर्सना सपोर्ट करते.
फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50 एमपीचा मेन आणि 2 एमपीचा सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 45 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, यात 6000 एमएएचची बॅटरी आहे.
किंमत किती ?
Oppo K13x 5G हा फोन भारतात तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 4 GB रॅम + 128 जीबी, 6 जीबी रॅम + 128 जीबी आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी. याची किंमत अनुक्रमे 11,999 रुपये, 12999 रुपये आणि 14999 रुपये आहे. हा फोन मिडनाईट व्हायलेट आणि सनसेट पीच या 2 रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन फ्लिपकार्ट तसेच ओप्पोच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समधून खरेदी करता येईल.