Smartphone : भारतात आज दाखल होणार Poco M5! लाँचिंगपूर्वी जाणून घ्या, खास फीचर्स…

| Updated on: Sep 05, 2022 | 1:07 PM

आज पोको ब्रँडचा Poco M5 हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाईल. तसेच हा डिवाइस देखील भारतीय ग्राहकांसाठी आज बाजारात दाखल केला जाणार आहे.

Smartphone : भारतात आज दाखल होणार Poco M5! लाँचिंगपूर्वी जाणून घ्या, खास फीचर्स...
पोको M5
Image Credit source: tv9
Follow us on

पोको एम 5 (Poco M5) स्मार्टफोन आज भारतीय बाजारात ग्राहकांसाठी लाँच होणार आहे, हा हँडसेट कंपनीच्या पोको एम 4चा (POCO M4) अपग्रेड व्हेरिएंट असू शकतो. आज कंपनी जागतिक बाजारात Poco M5 लाँच करणार आहे. तसेच हा डिवाइस भारतात देखील लाँच केला जाईल. पोको स्मार्टफोनसाठी (Smartphone), फ्लिपकार्टवर एक मायक्रोसाइट आधीच तयार करण्यात आली आहे. संबंधित वेबसाइटवर फोनच्या डिझाइनबद्दल आणि Poco M5मधील फीचर्सची माहिती मिळाली आहे, सर्व माहितीवरून हा स्मार्टफोन अत्यंत अत्याधुनिक फीचर्ससह बाजारात दाखल होणार असल्याचे दिसून येत आहे. फ्लिपकार्टवर बनवलेल्या मायक्रोसाइटवर एक नजर टाकल्यास असे दिसून येते, की या पोको मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G99 चिपसेट स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी वापरण्यात आला आहे. यासह Poco M5मध्ये 6 जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आणि 128 जीबीपर्यंत UFS 2.2 स्टोरेज मिळेल.

कसा असेल डिस्प्ले?

डिस्प्लेबद्दल फ्लिपकार्टवर बनवलेल्या मायक्रोसाइटवरील माहितीनुसार, Poco M5मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.58 इंचाचा फुल-एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले Widevine L1ला सपोर्ट करतो. चांगल्या टच रिस्पॉन्स रेटसाठी हा डिव्हाइस 240 Hz टच सॅम्पलिंग रेटसह उपलब्ध होईल.

ट्रिपल रियर कॅमेरा

फोनचे डिझाइन पाहता फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचे समोर आले आहे. फोनच्या मागील बाजूस कंपनी लेदर टेक्श्चरचा वापर करेल.

हे सुद्धा वाचा

कधी होणार दाखल?

Poco M5 भारतात आज संध्याकाळी 5:30 वाजता दाखल होईल. ग्राहकांना हा इव्हेंट लाइव्ह बघायला मिळेल. त्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या लिंकवर जावून फक्त इव्हेंट सुरू झाल्यावर व्हिडिओमध्ये दिसणारे प्ले बटण दाबायचे आहे आणि ग्राहक येथून थेट इव्हेंट पाहू शकता.

15,000 रुपयांपेक्षा कमी किंमत

लीकवर विश्वास ठेवला तर या Poco स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारात 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल. या किंमतीच्या विभागात हा फोन Narzo 50सह इतर अनेक स्मार्टफोन्सना टक्कर देईल. लिकनुसार किंमतही कमी असल्याने ग्राहकांमध्ये या स्मार्टफोनची उत्सुकता आहे.