50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Realme चा बजेट स्मार्टफोन बाजारात, फोनमध्ये काय असेल खास?

| Updated on: Feb 11, 2022 | 4:18 PM

रियलमीने (Realme) आपला नवीन स्मार्टफोन रियलमी सी 35 (Realme C35) बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन रियलमी सी25 (Realme C25) चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. Realme C35 हा कंपनीच्या परवडणाऱ्या लाइनअपमधील लेटेस्ट फोन आहे.

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Realme चा बजेट स्मार्टफोन बाजारात, फोनमध्ये काय असेल खास?
Realme C35
Follow us on

मुंबई : रियलमीने (Realme) आपला नवीन स्मार्टफोन रियलमी सी 35 (Realme C35) बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन रियलमी सी25 (Realme C25) चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. Realme C35 हा कंपनीच्या परवडणाऱ्या लाइनअपमधील लेटेस्ट फोन आहे. Realme C25 च्या तुलनेत, हा फोन केवळ चांगल्या स्पेसिफिकेशनसह येत नाही तर त्याचं डिझाईनदेखील वेगळं आहे. काही प्रमाणात, हा स्मार्टफोन Realme GT 2 सिरीजसारखा आहे. परंतु C-सिरीजसाठी पूर्णपणे नवीन आहे. दोन मोठे कॅमेरा कटआउट्स फोनला अप्रतिम बनवतात, तर स्पेसिफिकेशन्समुळे हा फोन लोकांची पसंती मिळवू शकतो, असा कंपनीला विश्वास आहे. कंपनीने हा फोन सर्वप्रथम थायलंडमध्ये लॉन्च केला आहे. त्याची भारतात एंट्री लवकरच होईल असे म्हटले जात आहे.

यात 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन भारतात कधी लाँच केला जाईल, याबद्दल Realme ने काहीही सांगितलेलं नाही. Realme ने भारतात 2022 मधील लाँच शेड्यूल आधीच शेअर केले आहे, त्यात सी-सिरीज फोनचा उल्लेख नाही, त्यामुळे हा फोन यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत तरी लाँच केला जाणार नाही, ही बाब स्पष्ट आहे.

Realme C35 ची किंमत

Realme C35 सध्या थायलंडमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,799 THB (जवळपास 13000) इतकी आहे. 128GB स्टोरेज व्हेरिएंट 6,299 THB (जवळपास 14000 रुपये) या किंमतीसह लॉन्च करण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ग्रीन या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Lazada, Shopee आणि JD थायलंड स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतो. हा फोन भारतात लॉन्च करण्याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Realme C35 चे स्पेसिफिकेशन्स

  1. Realme C35 स्मार्टफोन Realme C25 चे अपग्रेड म्हणून सादर करण्यात आला आहे. यामध्ये बॅक पॅनल नवीन डिझाइनसह मिळेल. यात 1080×2400 पिक्सेलसह 6.6 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आहे.
  2. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90.7 टक्के आहे आणि आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेट आणि 600 nits ब्राइटनेससह येते.
  3. Realme C35 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याच्या मागील बाजूस, 50MP प्रायमरी लेन्स, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP थर्ड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
  4. डिव्हाइस UNISOC T616 चिपसेट आणि 5000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. त्याची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हँडसेटमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.
  5. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, GPS, Bluetooth, 4G LTE आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत. फोनची जाडी 8.1mm आणि वजन 189 ग्रॅम आहे.
  6. फोनमध्ये लाइट सेन्सर, एक्सलेरेशन सेन्सर, मॅग्नेटिक इंडक्शन सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि जायरोस्कोप यांचा समावेश आहे.

इतर बातम्या

मोठी बॅटरी, 64MP कॅमेरासह Vivo चा किफायतशीर 5G स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

अवघ्या 14990 रुपये किंमतीत Vivo चा 5G फोन लाँच, जाणून 5 महत्त्वाचे फीचर्स

3D अवतार, स्क्रीन शेअरिंगसह भन्नाट फीचर्स, Instagram वापरणं अधिक मजेदार होणार, पाहा नवीन फीचर्सची यादी