
Realme ने सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Realme C71 5G लाँच केला आहे. ज्या लोकांना कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन एकदम परफेक्ट आहे. तर या फोनमध्ये तुम्हाला 6300 mAh ची पॉवरफूल बॅटरी, मिलिटरी ग्रेड स्ट्रॉंग बॉडी, ड्युअल व्ह्यू व्हिडिओ रेकॉर्डिंग, AI फीचर्स आणि रिव्हर्स चार्जिंग सारखे फीचर्स मिळतील. हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील आणि या फोनची विक्री कधी सुरू होईल? चला याबद्दल आजच्या या लेखात सविस्तर जाणून घेऊया.
Realme C71 5G ची भारतातील किंमत
भारतात लाँच झालेल्या Realme फोनच्या 4 GB / 64 GB व्हेरिएंटची किंमत 7,699 ]रुपये आहे आणि 6 GB / 128 GB ची किंमत 8,699 रुपये आहे.
कंपनीच्या अधिकृत साइटव्यतिरिक्त, या फोनची विक्री फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर सुरू झाली आहे. इंटरोडक्टरी ऑफर अंतर्गत, 6 GB व्हेरिएंट असलेल्या फोनची खरेदीवर ग्राहकांना 700 रुपयांची बँक कार्ड सूट मिळवू शकते.
तर या फोनच्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, या किंमत रेंजमध्ये, हा Realme फोन Samsung Galaxy F06 5G (किंमत 7,999), REDMI A4 5G (किंमत 8,947), LAVA Yuva 5G (किंमत 8,299) आणि POCO C75 5G (किंमत 7,699) सारख्या स्मार्टफोन्सना कडक स्पर्धा होणार आहे.
Realme C71 5G स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या Realme फोनमध्ये 6.74-इंचाचा LCD डिस्प्ले आहे जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 568 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
चिपसेट: या बजेट फोनमध्ये Unisoc T7250 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
रॅम: 6 जीबी मॉडेल 12 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करते, म्हणजेच तुम्ही 6 जीबीच्या किमतीत 18 जीबी पर्यंत रॅम मिळवू शकता.
कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा एआय कॅमेरा सेन्सर आणि समोर 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन एआय इरेजर, एआय क्लियर फेस, प्रो मोड आणि ड्युअल व्ह्यू व्हिडिओ सारख्या खास फिचर्ससह येतो.
बॅटरी: तर या फोनला 6300 mAh बॅटरी पॉवर देते जी 45 वॅट वायर्ड आणि 6 वॅट रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की फोनची बॅटरी 36 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते.
ऑपरेटिंग सिस्टम: हा बजेट फोन अँड्रॉइड 15 वर आधारित Realme UI वर काम करतो.