
तर त्याला जणू कोणतीच बंधने नको आहेत. तो मुळातच व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. पण त्याच्या या भूमिकेचा दहशतवादी, लहान मुलांचे शोषण करणारे, वाईट कामांसाठी निधी जमा करणाऱ्यांनी फायदा उठवला. त्याचे टेलिग्राम हे जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सोशल मीडियाच्या जगात युझर्सच्या संख्येनुसार ते सहाव्या क्रमांकावर आहे. रशियातील या तरुणाने इंटरनेटचा देव होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि सत्यात उतरवले. मॅसेजिंगच्या विश्वात मोठा चमत्कार केला. जगभरातील विद्यार्थ्यांचा गळ्यातील ताईत असलेले टेलिग्राम प्रत्यक्षात आणले. पॉवेल डुरोव नाम तो सुनाही होगा. जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तहेर संघटना मोसाद त्याच्या मागावर आहे. इतर देशांचा पण त्याच्यावर दबाव आहे. फ्रान्स सरकारने त्याला या 24 ऑगस्ट रोजी पॅरिसजवळ त्याच्या खासगी जेटने उतरताच अटक केली. त्याच्यावर संशय घेण्याइतपत चौकशीची आवश्यकता फ्रेंच न्यायालयाने व्यक्त केली. एकूणच टेलिग्रामचा सीईओ, मालक पॉवेल डुरोव याचे ग्रह फिरले आहेत, हे नक्की. अर्थात मॅसेजिंग जगतातील या बेताज बादशाहला...