Crystal 4k Neo TV: सॅमसंगचा क्रिस्‍टल 4के निओ टीव्‍ही लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

| Updated on: Jun 14, 2022 | 4:56 PM

35,990 रूपये किंमत असलेला हा टीव्‍ही आकर्षक डिस्‍प्‍ले, लक्षवेधक साऊंड वैशिष्‍ट्ये आणि अनेक स्‍मार्ट वैशिष्‍ट्यांच्‍या सर्वोत्तम समीकरणातून डिझाइन करण्‍यात आला आहे. क्रिस्‍टल टेक्‍नोलॉजी असलेल्‍या या टेलिव्हिजनमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत.

Crystal 4k Neo TV: सॅमसंगचा क्रिस्‍टल 4के निओ टीव्‍ही लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
samsung 4k neo tv
Image Credit source: samsung
Follow us on

सॅमसंग (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्‍टोअर सॅमसंग शॉप, ॲमेझॉन व फ्लिपकार्टवर त्‍यांच्‍या 43-इंच क्रिस्‍टल 4के निओ टीव्‍हीच्‍या (Crystal 4k Neo TV) लाँचची घोषणा केली. 35,990 रूपये किंमत असलेला हा टीव्‍ही आकर्षक डिस्‍प्‍ले, लक्षवेधक साऊंड वैशिष्‍ट्ये आणि अनेक स्‍मार्ट वैशिष्‍ट्यांच्‍या सर्वोत्तम समीकरणातून डिझाइन करण्‍यात आला आहे. क्रिस्‍टल टेक्‍नोलॉजीची शक्‍ती असलेल्‍या या टेलिव्हिजनमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. जसे प्रत्‍येक रंगाच्‍या नैसर्गिक सादरीकरणासाठी वन बिलियन ट्रू कलर्स, गडद सीन्‍समध्‍ये देखील सुस्‍पष्‍ट व्हिज्‍युअलसाठी एचडीआर10+ आणि सर्वोत्तम व्‍युइंग अनुभवासाठी बेझल लेस डिझाइन. क्रिस्‍टल 4के निओ टीव्‍हीमध्‍ये (TV) तुम्‍हाला अभूतपूर्व साऊंडचा अनुभव देण्‍यासाठी डॉल्‍बी डिजिअल प्‍लस आणि ॲडप्टिव्‍ह साऊंड टेक्‍नोलॉजी आहे. वैविध्‍यपूर्ण, वास्‍तविक रंगसंगती व थिएटरसारखा साऊंड अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला हा टेलिव्हिजन 4के रिझॉल्युशनमध्‍ये मनसोक्‍त मनोरंजनाचा आनंद घेण्‍याची आवड असलेल्‍या ग्राहकांसाठी योग्‍य निवड आहे.

आधुनिक काळातील मनोरंजन गरजा लक्षात घेत क्रिस्‍टल 4के निओ टीव्‍हीमध्‍ये कामासोबत धमाल करण्‍यासाठी काही स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये देखील आहेत. जसे इन-बिल्‍ट वॉईस असिस्‍टण्‍स, युनिव्‍हर्सल गाइड, पीसी मोड आणि सॅमसंग टीव्‍ही प्‍लस इत्‍यादी. तसेच गेमर्ससाठी ऑटो गेम मोड व मोशन एक्‍सलरेटर वैशिष्‍ट्ये अद्वितीय गेमिंग अनुभवासाठी जलद फ्रेम बदल व लो लेटन्‍सी देतात.

”क्रिस्‍टल 4के निओ टीव्‍हीमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व आकर्षक डिझाइनचे परिपूर्ण संयोजन आहे. हा टीव्‍ही सर्वोत्तम कन्‍टेन्‍ट व्‍युइंग अनुभवासाठी उत्तम डेप्‍थ व सखोल कॉन्‍ट्रास्‍ट्ससह वैविध्‍यपूर्ण रंगसंगती देतो. आकर्षक किंमत आणि उत्‍साहवर्धक आर्थिक पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या या टीव्‍हीसह आम्‍हाला विश्‍वास आहे की, क्रिस्‍टल 4के निओ टीव्‍ही ग्राहकांना उच्‍च दर्जाच्‍या इन-होम मनोरंजनासाठी अपग्रेड करण्‍यास सक्षम करेल,” असे सॅमसंग इंडियाच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या ऑनलाइन व्‍यवसायाचे वरिष्‍ठ संचालक संदीप सिंग अरोरा म्‍हणाले.

हे सुद्धा वाचा

किंमत व उपलब्‍धता

सॅमसंगचा नवीन क्रिस्‍टल 4के निओ टीव्‍ही 43-इंच आकाराच्‍या व्‍हेरिएण्‍टमध्‍ये येईल आणि सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्‍टोअर सॅमसंग शॉप, ॲमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्‍ध असेल. Amazonवरून टेलिव्हिजन खरेदी करणार्‍या ग्राहकांना Amazon Prime साठी मोफत एक वर्षाची सदस्यता आणि Flipkart वर खरेदी केल्यावर Disney Hotstar साठी एक वर्षाची सदस्यता मिळेल. ग्राहक टीव्‍ही खरेदी करताना एबीआय व एचडीएफसी बँक अशा आघाडीच्‍या बँकांकडून 12 महिने नो-कॉस्‍ट ईमएआयचा लाभ घेऊ शकतात.

क्रिस्‍टल 4के निओ टीव्‍ही पिक्‍चर

क्रिस्‍टल टेक्‍नोलॉजी: क्रिस्‍टल 4के निओ टीव्‍हीमध्‍ये डायनॅमिक क्रिस्‍टल डिस्‍प्‍लेच्‍या माध्‍यमातून सुस्‍पष्‍ट व विशाल दृश्‍ये दिसण्‍यासोबत तो वास्‍तववादी पिक्‍चर क्‍वॉलिटीची खात्री देतो. ही रेंज क्रिस्‍टलप्रमाणे रंगसंगतीचा अनुभव देते, ज्‍यामधून आकर्षक व विशाल चित्रे दिसण्‍याचा अनुभव मिळतो.

एचडीआर 10+: संपन्‍न, अचूक रंग व सखोल कॉन्‍ट्रास्‍टसह अधिक सुस्‍पष्‍टतेचा आनंद घ्‍या. एचडीआर 10+ चे डायनॅमिक टोन मॅपिंग सीननुसार रंग व कॉन्‍ट्रास्‍ट बदलते, ज्‍यामुळे तुम्‍हाला बारीक-सारीक गोष्‍टी देखील स्‍पष्‍टपणे दिसतात.

वन बिलियन ट्रू कलर्स: हे वैशिष्‍ट्य तुम्‍हाला कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा असा अनुभव देते की, ते प्रत्‍यक्षात समोर घडत आहे असे वाटते. या वैशिष्‍ट्याच्‍या माध्‍यमातून टीव्‍ही विविध रंग व्‍यक्‍त करत सानुकूल पिक्‍चर कार्यक्षमता व सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देतो.

बेझल-लेस डिझाइनसह सर्वोत्तम अनुभव: स्‍लीक, आकर्षक डिझाइन आधुनिक घरगुती सजावटीला साजेशी असून सर्वांचे लक्ष वेधून घेते. मोठ्या स्क्रीन आकारासह प्रेक्षकांना कन्‍टेन्‍टचा आनंद घेता येऊ शकतो. सोबतच गेमिंगप्रेमींना देखील मोठ्या आकारातील दृश्‍यांसह गेमिंगचा आनंद घेता येतो.

क्रिस्‍टल प्रोसेसर 4के: शक्तिशाली 4के प्रोसेसर तुम्‍हाला आवडणारे कन्‍टेन्‍ट 4के रिझॉल्‍युशनमध्‍ये पाहता येण्‍याची खात्री देते. अत्‍याधुनिक कलर मॅपिंग तंत्रज्ञानामुळे तुम्‍हाला वास्‍तविक रंगसंगतींचा अनुभव मिळेल.

ऑटो गेम मोड आणि मोशन एक्सलरेटर: या तंत्रज्ञानांसह तुमच्‍यामधील गेमरला नवीन झेप घेऊ द्या. तुम्‍हाला अद्वितीय गेमिंग अनुभवासाठी सर्वोत्तम फ्रेम बदल व लो लेटन्‍सी मिळेल.

साऊंड

डॉल्‍बी डिजिटल प्‍लस: 3 डी साऊंड इफेक्‍ट्सचा आनंद घेण्‍यासोबत सर्वोत्तम पद्धतीने थिएटरप्रमाणे कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा आनंद घ्‍या

ॲडप्टिव्‍ह साऊंड: क्रिस्‍टल ४के निओ टीव्‍हीमध्‍ये सानुकूल व्‍युइंग अनुभवासाठी कन्‍टेन्‍टनुसार आवाज समायोजित करण्‍यासाठी स्‍मार्ट ॲडप्टिव्‍ह साऊंड वैशिष्‍ट्य आहे.

म्‍युझिक प्‍लेअर: म्‍युझिक प्‍लेअर प्‍लेलिस्‍टमध्‍ये वास्‍तववादी व्हिज्‍युअल घटकांची भर करत एकूण ऑडिओ अनुभव वाढवते. ज्‍यामुळे टीव्‍ही व्‍हर्च्‍युअल म्‍युझिक सिस्टिममध्‍ये बदलून जातो. तसेच तुम्‍ही गाना म्‍युझिकमधून हजारो गाणी ऐकण्‍याचा देखील आनंद घेऊ शकता.

स्‍मार्ट वैशिष्‍ट्ये

इन-बिल्‍ट वॉईस असिस्‍टण्‍ट्स: या यूएचडी टीव्‍हीमध्‍ये अधिक आरामदायी व कनेक्‍टेड इकोप्रणालीसाठी गुगल असिस्टण्‍ट, ॲलेक्‍सा आणि बिक्‍स्‍बीसोबत बिल्‍ट-इन कनेक्टिव्‍हीटी आहे. आता ग्राहक त्‍यांच्‍या आवाजांसह कन्‍टेन्‍ट शोधू शकतात, चॅनेल्‍स बदलू शकतात, आवाज कमी-जास्‍त करू शकतात, प्‍लेबॅकवर नियंत्रण ठेवू शकतात आणि अशा अनेक गोष्‍टी करू शकतात.

युनिव्‍हर्सल गाइड: युनिव्‍हर्सल कन्‍टेन्‍ट गाइडसह युजर्स चॅनेलचा शोध घेण्‍यापेक्षा पाहण्‍याचा अधिक आनंद घेऊ शकतील. हे वैशिष्‍ट्य युजर्सना भारताच्‍या लोकप्रिय स्ट्रिमिंग ॲप्‍समधील क्‍युरेटेड कन्‍टेन्‍टच्‍या यादीमधून त्‍यांचे आवडते चित्रपट व टीव्‍ही मालिका शोधण्‍यामध्‍ये मदत करते.

टीव्‍ही प्‍लस: मोफतपणे सॅमसंग टीव्‍ही प्‍लसमध्‍ये लॉग इन करत रिपब्लिक टीव्‍ही, डिस्‍कव्‍हरी टीव्‍ही इत्‍यादी सारखे ५५ जागतिक व स्‍थानिक लाइव्‍ह चॅनेल्‍स पहा;

पीसी मोड: हे वैशिष्‍ट्य टीव्‍हीला पर्सनल कम्‍प्‍युटरमध्‍ये बदलते. हे वैशिष्‍ट्य ग्राहकांना डॉक्‍युमेण्‍ट्स तयार करण्‍यामध्‍ये किंवा क्‍लाऊडमधून काम करण्‍यामध्‍ये साह्य करते. तसेच या वैशिष्‍ट्यासह मोठ्या स्क्रीनवर किंवा विस्‍तारित स्क्रीनवर कन्‍टेन्‍टचा आनंद घेण्‍यासाठी इंटरनेट कनेक्‍शनशिवाय वायरलेस स्क्रीन मिररिंगची सुविधा मिळते.

(टिप- हेडलाईन व्यतिरिक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)