AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Bank Rules : SBI खातेधारकांनो लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून ATM व्यवहारांवर लागणार नवे शुल्क , नवा नियम जाणून घ्या

SBIच्या Salary Package Account धारकांसाठी 1 ऑक्टोबर 2026 पासून दुसऱ्या बँकेच्या ATM आणि ADWMवरील मोफत व्यवहारांची मर्यादा 10 वरून 5 होणार आहे. व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यास ग्राहकांना अतिरिक्त पैसे भरावे लागण्याची शक्यता आहे.

SBI Bank Rules  :  SBI खातेधारकांनो लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून ATM व्यवहारांवर लागणार नवे शुल्क , नवा नियम जाणून घ्या
SBI BANKSBI BANKImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 4:16 PM
Share

SBI मध्ये तुमचं खातं असेल आणि तुम्ही वारंवार ATM मधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून SBI च्या काही खात्यांसाठी ATM व्यवहारांचा नियमांमध्ये बदल होणार आहेत. विशेषत: सॅलरी पॅकेज अकाऊंट आणि बेसिक सेविंग बँक डिपॉझिट म्हणजेच BSBD ACCOUNT असलेल्या ग्राहाकंवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो.

सॅलरी अकाउंट असणाऱ्यांसाठी मोठी बदल

SBI च्या सॅलरी पॅकेज अकाउंट असलेल्या ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या ATM किंवा ADWN मधून पैसे काढताना आतापर्यंत महिन्याला 10 मोफत व्यवहारांची सुविधा होती. पण 1 ऑक्टोबरपासून ही मर्यादा ५ व्यवहारांवर येणार आहे. ही मर्यादा SBI च्या सर्व प्रकारच्या सॅलरी पॅक अकाउंटला लागू असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या ५ व्यवहारांमध्ये फक्त पैसे काढणेच नाही तर Balance cheque आणि mini statement सारखे non- ficitional व्यवहारही मोजले जाणार आहेत. म्हणजेच महिन्यात दुसऱ्या बँकेच्या ATM वर केलेल्या अशा व्यवहारांची संख्या ठेवावी लागणार आहे.

५ व्यवहार संपल्यानंतर किती पैसे मोजावे लागतील

महिन्याची 2 मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यावर दुसऱ्या बँकच्या ATM मधून CASH WITHDRAWAL केल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 23 रूपये आणि त्यावर GST द्यावा लागेल. BALANCE cheque किंवा mini statement सारख्या non- ficitional व्यवहारांसाठी 11 रूपये आणि GST आकारला जाईल.

BSBD ACCOUNT ग्राहकांसाठीही बदल

SBI च्या बेसिक सेविंग बँक डिपॉझिट म्हणजेच BSBD ACCOUNT साठीही 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. या खात्यात महिन्याला 4 CASH WITHDRAWAS मोफत असतील. त्यानंतर केलेल्या प्रत्येक CASH WITHDRAWAL साठी 15 रूपये आणि त्यावर GST आकारला जाईल.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...