AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलचे चार्जिंग टिकवण्यास मदत करतील ‘या’ 5 सोप्या ट्रिक्स

फोनमधील बॅटरी लवकर संपल्याने मोठा त्रास होऊ शकतो. जर तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत असेल तर इथे सांगितलेल्या काही पद्धती फॉलो केल्या जाऊ शकतात. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लाइफ सुधारण्यास मदत होते.

मोबाईलचे चार्जिंग टिकवण्यास मदत करतील 'या' 5 सोप्या ट्रिक्स
| Edited By: | Updated on: Nov 29, 2024 | 8:04 PM
Share

आपल्या दैनंदिन जीवनातील जवळपास सर्व कामांसाठी आपण फोन वापरत असतो. त्यामुळे फोनच्या चार्जिंगची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यात तुमचं एखाद महत्वाचं काम करताना फोनची बॅटरी अचानक संपली तर तुमच्या अनेक कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यातच जर तुम्ही इंटरनेटद्वारे जीपीएसच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी जात असाल आणि फोनची बॅटरी संपत आली असेल तर मोठी अडचण निर्मण होऊ शकते. अनेक वेळा मोबाईलची चार्जिंग टिकत नाही किंवा चार्ज होणं खूप वेळ घेतं. जर तुम्हाला असं काही अनुभवायला मिळत असेल, तर तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स वापरून मोबाईलचे चार्जिंग टिकवण्यास मदत होऊ शकते.

तुमच्या फोनची चार्जिंग पूर्ण असून सुद्धा काही वेळातच बॅटरी संपून जात असेल तर तुम्ही काही सोप्या टिप्सच्या मदतीने स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता. चालं तर मग जाणून घेऊयात या सोप्या ट्रिक्स

फोनच्या दीर्घ बॅटरी लाइफसाठी टिप्स

फोन चार्ज करण्यापूर्वी थंड करा

तुमचा फोन चार्जिंगला लावताना थंड आहे की नाही हे नेहमी तपासून घ्या, चार्जिंग दरम्यान ओव्हरहीटिंग केल्याने बॅटरी जलद परिणाम होतेच, शिवाय फोनच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फोन चार्ज करण्यापूर्वी फोन थंड करायला विसरू नका. ही सोपी ट्रिक तुमच्या फोनची बॅटरी लाइफ सुधारू शकते.

स्क्रीन रिफ्रेश रेट 60 हर्ट्झवर सेट करा

उच्च रिफ्रेश रेट तुमच्या फोनची अधिक पावर खर्च करतो, विशेषत: जेव्हा तुम्ही गेमिंग किंवा इतर हाय- परफॉर्मेंस कार्यांसाठी फोन वापरत नसताना तुमच्या फोनच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्झवर सेट केल्यास बॅटरीची बचत होऊ शकते.

रिफ्रेश रेट निश्चित करण्यासाठी, Display and Brightness > Screen Refresh Rate > Select 60Hz हे पर्याय निवडा. जेव्हा तुम्ही फोन वापरत नसाल तेव्हा अधिक शक्ती वाचविण्यासाठी स्क्रीन टाइमआऊट 10 सेकंदांसारख्या कमीतकमी सेटिंगवर सेट करा.

नेव्हिगेशन ॲप्स आणि नोटिफिकेशन बंद करा

नेव्हिगेशन ॲप्स, नोटिफिकेशन्स आणि बॅकग्राऊंड लोकेशन ट्रॅकिंग हे तुमच्या बॅटरी वेगाने कमी करू शकते. यापुढे आवश्यकता नसल्यास, जीपीएस-आधारित नेव्हिगेशन प्स बंद करा आणि सक्रिय ॲप्सची संख्या मर्यादित करा जेणेकरून तुम्ही फोन अधिकवेळ वापरू शकाल. तसेच बॅकग्राऊंड ॲप्स आणि बॅकग्राऊंड डेटा बंद करा. हा छोटासा बदल बॅटरी वाचवण्यास मदत करू शकतो.

गरज नसताना 5 जी बंद करा

5 जी नेटवर्क तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करते, परंतु यामध्ये बॅटरी अधिक वापर होते. जर तुम्हाला इतर काम करताना नेहमीच हाय-स्पीड डेटाची आवश्यकता नसेल तर तुम्ही मेसेजिंग किंवा ब्राउझिंगसारखी हलकी कामे करताना 4 जी वर डेटा स्विच करू शकता. हा सोपा बदल बॅटरीचा अनावश्यक वापर टाळू शकतो.

बॅटरी सेव्हर मोड वापरा

फोनची बॅटरी जास्तीत जास्त काळ चालवायची असेल तर बॅटरी सेव्हर मोड ॲक्टिव्हेट करा. यामुळे हे फिचर बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटीची कार्यक्षमता कमी करते आणि सामान्यत: हे बॅटरी मोड चालू केल्यावर असे काही फीचर्स चे काम थांबवते जे जास्त करून बॅटरीचा वापर करतात. यासाठी तुमच्या फोनच्या बॅटरी सेटिंग्जद्वारे हा मोड ॲक्टिव्हेट करू शकता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.