Technology : Vivo चा नवीन बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च, 8GB RAM, किंमत अगदी बजेटमध्ये

| Updated on: Feb 18, 2023 | 12:11 PM

या नवीनतम लॉन्च झालेल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5000mAh मजबूत बॅटरी देण्यात आली आहे.

Technology :  Vivo चा नवीन बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च, 8GB RAM, किंमत अगदी बजेटमध्ये
विव्हो फोन
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई , स्मार्टफोन ब्रँड Vivo ने आपल्या Y-सिरीजमध्ये आणखी एका स्मार्ट फोनची भर घातली आहे. या मालिकेत Vivo ने आणखी एक नवीन स्मार्टफोन Vivo Y56 5G सादर केला आहे. हा फोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या नवीनतम लॉन्च झालेल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5000mAh मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये तुम्हाला 50MP चा कॅमेरा मिळेल. चला जाणून घेऊया या उपकरणाची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत.

VIVO Y56 5G चे तपशील

  • डिस्प्ले: 6.58 इंच LCD डिस्प्ले
  • प्रोसेसर: मीडियाटेक डायमेन्सिटी 700 ऑक्टा-कोर प्रोसेसर माली G52 GPU सह
  • रॅम: 8 जीबी रॅम
  • मागील कॅमेरा: 50MP मुख्य लेन्स आणि 2MP बोकेह सेन्सर
  • फ्रंट कॅमेरा: 16MP सेल्फी कॅमेरा
  • बॅटरी: 5000mAh बॅटरी
  • चार्जिंग: 18W जलद चार्जिंग
  • ऑपरेटिंग सिस्टम: Android 13 आधारित FunTouchOS 13
  • सुरक्षा: फिंगरप्रिंट स्कॅनर

नवीनतम लॉन्च केलेल्या Vivo Y56 5G मध्ये, तुम्हाला 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिझोल्यूशन 2408 × 1080 पिक्सेल आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशो आहे. फोनची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याची रॅम वाढवू शकता. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, ड्युअल सिम, वाय-फाय, जीपीएस आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

VIVO Y56 5G किंमत

हा फोन मिड रेंज कॅटेगरीत बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. फोनची किंमत 19,999 रुपये आहे. या किमतीत 8GB रॅम + 128GB स्टोरेज असलेले व्हेरिएंट उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ऑरेंज शायनर आणि ब्लॅक इंजिन कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअरवरून फोन खरेदी करू शकता.

हे सुद्धा वाचा

Infinix NOTE 12i स्वस्त झाला

Infinix NOTE 12i ची किंमत सध्या Flipkart वर 9,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज दिले जात आहे. फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले, 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.