AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp आणि Signal वर मात करत Telegram ठरलं सर्वाधिक डाऊनलोड होणारं अ‍ॅप

अनेक युजर्सनी WhatsApp च्या नव्या अटी मान्य करण्याऐवजी WhatsApp वापरणं बंद करण्यास प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अशा युजर्सनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सकडे मोर्चा वळवला आहे.

WhatsApp आणि Signal वर मात करत Telegram ठरलं सर्वाधिक डाऊनलोड होणारं अ‍ॅप
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 08, 2021 | 12:22 PM
Share

मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्तींसह गोपनीयता धोरण (Privacy policy) सादर केलं आहे. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. WhatsApp च्या या नव्या धोरणामुळे अनेक युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेकांनी WhatsApp च्या या अटी मान्य करण्याऐवजी WhatsApp वापरणं बंद करण्यास प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अशा युजर्सनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सकडे मोर्चा वळवला आहे. त्यातही बहुतांश युजर्स हे त्यांचं WhatsApp अकाऊंट डिलीट करुन Telegram आणि Signal सारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा WhatsApp ला जोरदार फटका बसला आहे. (Telegram the Most Downloaded App Globally in January, WhatsApp Slides to Fifth: Sensor Tower)

व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या गोपनीयता धोरणाबाबत आतापर्यंत दोन वेळा स्पष्टीकरण दिले आहे. तसेच युजर्सचा डेटा कोणासोबतच शेअर केला जाणार नसून सर्व डेटा सुरक्षित आहे, असे स्पष्टीकरण देऊन व्हॉट्सअ‍ॅपने ग्राहकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने लोक व्हॉट्सअ‍ॅप बंद करुन सिग्नल किंवा टेलिग्राम अ‍ॅपवर शिफ्ट होत आहेत. त्यामुळे या महिन्यात नव्याने अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्याच्या बाबतीत व्हॉट्सअ‍ॅप पिछाडीवर आहे. तर टेलिग्राम आणि सिग्नल या दोन अ‍ॅप्सनी बाजी मारली आहे. या दोन्ही अ‍ॅप्सना युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जानेवारी 2021 मध्ये टेलिग्राम सर्वाधिक डाऊनलोड केलं जाणारं नॉन गेमिंग अ‍ॅप ठरलं आहे. जगभारातील टेलिग्रामच्या एकूण डाऊनलोड्सपैकी 24 टक्के डाऊनलोड्स हे भारतातून झाले आहेत. सेंसर टॉवरच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात (जानेवारी) जगभरात 63 मिलियन्स (6.3 कोटी) वेळा टेलिग्राम डाऊनलोड करण्यात आलं आहे. यापैकी 15 मिलियन्स (1.5 कोटी) डाऊनलोड्स एकट्या भारतात झाले आहेत. सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या नॉन गेमिंग अ‍ॅप्सच्या यादीत दुसरं स्थान टिकटॉकने पटकावलं आहे. टिकटॉग जरी भारतात बॅन असलं तरी जगभरात या अ‍ॅपला चांगलीच पसंती मिळत आहे. टिकटॉकनंतर सिग्नल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या अ‍ॅप्सचा अनुक्रमे तिसरा, चौथा, पाचवा क्रमांक लागतो. सेंसर टॉवरच्या लेटेस्ट ब्लॉग पोस्ट, टॉप अ‍ॅप्स वर्ल्डवाईड फॉर January 2021 मध्ये दिलेल्या माहितीनुसार टेलिग्रामने व्हॉट्सअ‍ॅपसह टिकटॉक, सिग्नल आणि फेसबुकला मागे टाकलं आहे.

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

WhatsApp

WhatsApp मध्ये युजर्सची मागणी असलेलं प्रत्येक लहान-मोठं फिचर आहे. मग ते पर्सनल अथवा ग्रुप चॅट असो किंवा व्हिडीओ/ऑडियो कॉल असेल. WhatsApp मध्ये युजर्सच्या सोयीचं प्रत्येक फिचर देण्यात आलं आहे. WhatsApp तुम्हाला इन्स्टाग्रामप्रमाणे स्टोरी अपलोड करण्याचं फिचर देतं. यात काही मर्यादादेखली आहेत, जसे की एका ग्रुपमध्ये केवळ 256 लोकांनाच सहभागी होता येतं. व्हिडीओ किंवा ऑडियो कॉलमध्ये एकावेळी केवळ 8 च जणांना सहभागी होता येतं. WhatsApp वर सर्व प्रकारच्या फाईल्स शेअर करता येतात, परंतु त्यावर साईज लिमिट आहे. फोटो, व्हिडीओ आणि ऑडियो फाईल्ससाठी ही मर्यादा 16MB पर्यंत आहे. डॉक्युमेंट्सच्या बाबतीत ही मर्यादा 100MB पर्यंत आहे. परंतु युजर्स सध्या WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे कंपनीवर नाराज आहेत.

Telegram App

Telegram App त्यांच्या युजर्सना अनेक फिचर्स देतं. Telegram वर तुम्हाला WhatsApp प्रमाणे चॅटिंग, ग्रुप चॅट आणि चॅनेलसारखे महत्त्वाचे फिचर्स दिले जातात. तसेच इतरही अनेक फिचर्स दिले जातात. टेलिग्रामवरील ग्रुप्समध्ये, चॅनेल्समध्ये 2 लाख युजर्स सहभागी होऊ शकतात. WhatsApp मध्ये ही मर्यादा 256 इतकी आहे. टेलिग्रामवरील ग्रुप्समध्ये तुम्ही बॉट, पोल, क्विज, हॅशटॅगसह अनेक इंस्ट्रूमेंट्सचा वापर करु शकता. त्यामुळे तुमचं चॅटिंग अधिकच इंटरेस्टिंग होईल. टेलिग्राम तुम्हाला Self Destructing Messages ची सुविधा देतं. टेलिग्रामवर तुम्ही 1.5 जीबीपर्यंतच्या फाईल्स शेअर करु शकता. या अॅपमध्ये अँड्रॉयड (Android) आणि आयओएस डिव्हाईसवर (iOS devices) व्हाईस आणि व्हिडीओ कॉल (video call) हे दोन्ही फिचर्स आहेत. तसेच हे अॅप पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे अॅप एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे. या अॅपमध्ये तुम्हाला सिक्रेट चॅटचा पर्यायही देण्यात आला आहे. यापैकी कोणतंही फिचर WhatsApp मध्ये देण्यात आलेलं नाही.

Signal App

Signal App त्यांच्या युजर्सना सुरक्षित मेसेज, ऑडियो आणि व्हिडीओ कॉलसारखे फिचर्स देतं. या अॅपवरील सर्व प्रकारचे संवाद हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (end-to-end encrypted) असतात. या अॅपमध्येदेखील ग्रुप्सचा पर्याय आहे. परंतु या अॅपवर एकच मेसेज खूप लोकांना पाठवता येत नाही. या अॅपने नुकतंच ग्रुप कॉलिंग हे फिचर लाँच केलं आहे. सिग्नल अॅपमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण फिचर देण्यात आलं आहे, ते म्हणजे नोट-टू-सेल्फ (Note to Self). या फिचरद्वारे तुम्ही स्वतःला मेसेज पाठवू शकता. स्वतःचा एक वेगळा ग्रुप बनवू शकता.

संबंधित बातम्या 

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

टेलिग्रामवर मात करण्यासाठी फेसबुककडून खोटा अपप्रचार, मार्केटिंगवर 73 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा

WhatsApp ऐवजी Telegram निवडणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी, अ‍ॅप सुरक्षित नसल्याचा दावा

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

आता WhatsApp वरील चॅट्स Telegram वर मूव्ह करा, नवं फिचर लाँच

(Telegram the Most Downloaded App Globally in January, WhatsApp Slides to Fifth: Sensor Tower)

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?