टेलिग्रामवर मात करण्यासाठी फेसबुककडून खोटा अपप्रचार, मार्केटिंगवर 73 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा

"फेसबुकचं एक पूर्ण डिपार्टमेंट रिसर्च करतंय की, टेलिग्राम इतकं लोकप्रिय का झालं आहे." असा दावा टेलिग्रामचे सीईओ Pavel Durov यांनी केला आहे.

टेलिग्रामवर मात करण्यासाठी फेसबुककडून खोटा अपप्रचार, मार्केटिंगवर 73 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 10:26 AM

मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या आहेत. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, या नवीन धोरणावरुन Telegram ने WhatsApp ला लक्ष्य केले आहे. (Facebook doesn’t wants people to use telegram, thats why spreading lies about us : Pavel Durov)

टेलिग्रामचे सीईओ Pavel Durov म्हणाले की, “फेसबुकचं एक पूर्ण डिपार्टमेंट रिसर्च करतंय की, टेलिग्राम इतकं लोकप्रिय का झालं आहे. युजर्स सध्या WhatsApp च्या नवीन पॉलिसीवरुन नाराज आहेत. अनेकांमध्ये WhatsApp बाबत राग आहे, कारण त्यांना माहीत आहे की, त्यांचा संपूर्ण डेटा फेसबुक अॅड (जाहिरात) इंजिनवर दिसणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक WhatsApp युजर्स टेलिग्रामवर शिफ्ट होत आहेत”.

Durov म्हणाले की, “फेसबुक अधिकृत WhatsApp ने टेलिग्रामवर मात करण्यासाठी मार्केटिंगचा मार्ग निवडला आहे. एका आर्टिकलचा (लेख) हवाला देत Durov म्हणाले की, टेलिग्रामवरील 500 मिलियन युजर्स आणि सातत्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे फेसबुक कॉर्पोरेशन चिंतेत आहे. युजर्सच्या प्रायव्हसीबाबत टेलिग्रामची गुणवत्ता WhatsApp च्या टीमवर मात करत आहे. विकिपीडियो तज्ज्ञांनी सांगितले की, अनेक बॉट्सच्या मदतीने फेसबुक टेलिग्रामबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवत आहे”.

Durov यांनी असा दावा केला आहे की, “फेसबुकने गेल्या काही महिन्यांमध्ये केवळ मार्केटिंगसाठी 10 बिलियन डॉलर्स (जवळपास 73 हजार 378 कोटी रुपये) खर्च केले आहेत. टेलिग्राम ही रशियन कंपनी असल्याची अफवा पसरवली जाते. परंतु रशियामध्ये आमचं कोणतंही कार्यालय नाही. 2018 पासून टेलिग्राम रशियामध्ये ब्लॉक आहे. टेलिग्रामबद्दल अफवा पसरवली जात आहे की हे अॅप एनक्रिप्टेड नाही, परंतु हे साफ चुकीचं आहे. टेलिग्राम हे एंड टू एंड एनक्रिप्टेड अॅप आहे. टेलिग्रामवरील चॅट हे पूर्णपणे सुरक्षित आहे”.

काय आहे WhatsApp चं नवीन धोरण?

WhatsApp ने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक नवं धोरण सादर केलं आहे. त्यानुसार कंपनी युजर्स जो कंटेंट WhatsApp वर शेअर करतोय, स्वीकारतोय (जो डेटा त्याच्यासोबत शेअर केला जातोय), युजर जो डेटा साठवून ठेवतोय, तो डेटा किंवा तो कंटेंट कंपनी वापरु शकते, शेअर करु शकते. कंपनीचं हे धोरण स्वीकारणं युजर्सना भाग आहे. कंपनीने या अटी-शर्तींखाली केवळ दोनच पर्याय दिले आहेत. कंपनीचं नवं धोरण म्हणजेच नव्या अटी-शर्ती स्वीकारा अथवा स्वीकारु नका (Accept or Reject). जर तुम्ही कंपनीच्या नव्या अटी मान्य केल्या नाहीत तर तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं.

युजर्सचा डेटा फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केला जाणार

WhatsApp च्या नवीन धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल. व्हॉट्सअॅपवरील डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने आता स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहील. असं म्हटलं जातंय की, जवळपास आपली WhatsApp सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाईल.

हेही वाचा

WhatsApp ऐवजी Telegram निवडणाऱ्या युजर्ससाठी वाईट बातमी, अ‍ॅप सुरक्षित नसल्याचा दावा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती WhatsApp नाही तर Signal App वापरतो, कारण काय?

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

(Facebook doesn’t wants people to use telegram, thats why spreading lies about us : Pavel Durov)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.