तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या आहेत.

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 12:21 PM

मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या आहेत. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. (know everything about Whatsapp new Privacy Policy 2021 users date will share with Facebook and Instagram)

WhatsApp ने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक नवं धोरण सादर केलं आहे. त्यानुसार कंपनी युजर्स जो कंटेंट WhatsApp वर शेअर करतोय, स्वीकारतोय (जो डेटा त्याच्यासोबत शेअर केला जातोय), युजर जो डेटा साठवून ठेवतोय, तो डेटा किंवा तो कंटेंट कंपनी वापरु शकते, शेअर करु शकते. कंपनीचं हे धोरण स्वीकारणं युजर्सना भाग आहे.

कंपनीने या अटी-शर्तींखाली केवळ दोनच पर्याय दिले आहेत. कंपनीचं नवं धोरण म्हणजेच नव्या अटी-शर्ती स्वीकारा अथवा स्वीकारु नका (Accept or Reject). जर तुम्ही कंपनीच्या नव्या अटी मान्य केल्या नाहीत तर तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं.

युजर्सचा डेटा फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केला जाणार

WhatsApp च्या नवीन धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल. व्हॉट्सअॅपवरील डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने आता स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहील. असं म्हटलं जातंय की, जवळपास आपली WhatsApp सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाईल.

युजर्सच्या प्रायव्हसीचं काय?

WhatsApp च्या नव्या धोरणांमुळे युजर्सची प्रायव्हसी कायम राहणार नाही. WhatsApp आता युजर्सची इत्यंभूत माहिती ठेवणार आहे. प्रामुख्याने आपला आर्थिक डेटा साठवून ठेवला जाणार आहे. म्हणजेच आपल्या आर्थिक व्यावहारांवरुन आपण गरीब आहोत, श्रीमंत आहोत की मध्यमवर्गीय आहोत याची वर्गवारी केली जाणार आहे. त्यानुसारच आपल्याला सोशल मीडियावर जाहिराती दिसतील. (उदा. श्रीमंत युजर्सना त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर महागड्या गाड्या, गॅजेट्सच्या जाहिराती दिसतील). कंपनी आपल्या डेटाचा वापर करुन अधिक पैसे कमावणार आहे.

युजर्सचा डेटा शेअर होणार

WhatsApp च्या नव्या धोरणात स्पष्ट नमूद केलं आहे की, तुम्ही WhatsApp वर जो कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसिव्ह करत आहात त्याचा वापर रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लूझिव्ह, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रान्सफरेबल लायसन्स दिलं जात आहे.

संबंधित बातम्या

1 जानेवारीपासून Samsung, Apple, LG आणि Moto च्या ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?

Good News : आता WhatsAppच्या एकाच क्रमांकावरून चार डिव्हाइस चालणार; लवकरच नवे फीचर्स सेवेत

(know everything about Whatsapp new Privacy Policy 2021 users date will share with Facebook and Instagram)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.