सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp मध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड झाला आहे. (WhatsApp Groups may accessible publicly via Google Search)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:22 PM, 10 Jan 2021
सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी
Whatsapp chatting New Feature

मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp मध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे काही प्रायव्हेट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप गूगलच्या सर्चमध्ये दिसत आहे. त्यामुळे गूगलवर सर्च करणारा कोणताही व्यक्ती या ग्रुपमध्ये अगदी सहज सहभागी होऊ शकतो. याआधी 2019 मध्येही अशाप्रकारे तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र त्यावर युजर्सने तक्रार केल्यानंतर त्यात दुरस्ती करण्यात आली होती. (WhatsApp Groups may accessible publicly via Google Search)

याशिवाय काही युजर्सचे प्रोफाईलही गूगलच्या सर्च रिझल्टमध्ये दिसत आहेत. यामुळे त्या संबंधित युजर्सचा फोन नंबर आणि प्रोफाईल फोटोही गूगलवर पाहायला मिळत आहे.

स्वतंत्र सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गूगलवर अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटचे Invite Index पाहायला मिळत आहे. site: chat.whatsapp.com हे सर्च केल्यानंतर गूगलवर अनेक व्हॉट्सअॅपच्या लिंक पाहायला मिळत आहे.

गूगलवर याबाबत सर्च केल्यानंतर हजारो ग्रुपच्या Invite लिंक समोर येत आहे. त्यातील काही ग्रुपवर अश्लील व्हिडीओही शेअर करण्यात आले आहेत. तर काही ग्रुप हे संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी बनवण्यात आले आहेत. गॅजेट 360 ने दिलेल्या माहितीनुसार, यात मराठी, बंगाली यासारख्या युजर्ससाठी ग्रुप्स बनवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये जे Invite नाही, तेही सहभागी होऊ शकतात.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपचे 4 हजारांहून अधिक ग्रुपच्या लिंक या गुगलवर उपलब्ध झाल्या होत्या. यात या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक देण्यात आली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात डेटाचे उल्लंघन झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर एका मोठ्या संकटाचा व्हॉट्सअ‍ॅप सामना करावा लागला होता.

WhatsApp च्या नवीन अटी आणि शर्ती

दरम्यान नुकतंच WhatsApp च्या नवीन अटी आणि शर्ती आणल्या आहेत. नवीन धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल. व्हॉट्सअ‍ॅपवरील डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने आता स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहील. असं म्हटलं जातंय की, जवळपास आपली WhatsApp सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाईल. (WhatsApp Groups may accessible publicly via Google Search)

संबंधित बातम्या : 

व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यापूर्वी ‘या’ सवयींना आळा घाला, अन्यथा….

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल