व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यापूर्वी ‘या’ सवयींना आळा घाला, अन्यथा….

अटी आणि शर्ती या फेसबुकसोबत करण्यात येणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या आहेत. (Whatsapp Policy Share Personal data With facebook)

व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यापूर्वी 'या' सवयींना आळा घाला, अन्यथा....
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 9:20 AM

मुंबई : जगभरातील कोट्यवधी युजर्सला नववर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात WhatsApp ने नव्या अटी आणि शर्थींचे नोटिफिकेशन टाकलं आहे. या अटी आणि शर्ती मान्य करणे, प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला गरजेचे असणार आहे. या नव्या अटी आणि शर्ती या फेसबुकसोबत करण्यात येणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या आहेत. (Whatsapp Policy Share Personal data With facebook)

मात्र या अटी शर्ती मान्य केल्यानंतर युजर्सला आणखी सतर्क राहणे गरजेचे आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅसेंजर चॅट, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप याला Merge करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सला जारी केलेल्या नवीन अटी आणि शर्थींनुसार तो तुमचा डेटा फेसबुकद्वारे दुसरीकडे शेअर होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सकडून त्यांच्या प्रायव्हसीचे उल्लंघन होऊ नये किंवा तुमचा डेटा चोरी होऊ नये यासाठी तुम्ही WhatsApp ला तुमची खासगी माहिती देऊ नका. बँकिंग ट्रान्झेक्शन डेटा, सर्व्हिस रिलेटेड इन्फॉर्मेशन, मोबाईल डिवाईस इन्फॉर्मेशन आणि आयपी अ‍ॅड्रेर्स यासारखी माहिती शेअर होऊ शकते.

एका आकडेवारीत मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्सचा जवळपास 16 प्रकारचा डेटा उपलब्ध असतो. यात डिवाईस आयडी, यूजर आयडी, विज्ञापन डेटा, खरेदीची हिस्ट्री, तुमचं लोकेशन, फोन नंबर, ई-मेल, कॉन्टॅक्ट लिस्ट, प्रोडक्ट इंटिग्रेशन, क्रॅश डेटा, परफॉरमन्स डेटा, अदर डायग्नोस्टिक डेटा, पेमेंट इन्फॉरमेशन, कस्टमर सपोर्ट, प्रोडक्ट इनटरेक्शन आणि अदर यूजर कन्टेंट यासारख्या माहितांचा समावेश आहे. यात तुम्ही कोणासोबत चॅट करता, चॅटमध्ये काय लिहिता याचीही माहिती शेअर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युजर्सने बँक किंवा इतर गरजेची माहिती कोणालाही देऊ नका. कोणत्याही लेणे-देणे संबंधित माहिती शेअर करु नका. तुमचा मेडिकल डेटा कोणालाही देऊ नका. तसेच तुम्ही तुमच्या बँकेच्या पासबुकचा फोटो पाठवू नका. जर तुम्ही अशाप्रकारची कोणतीही माहिती पाठवत असला, तर तुम्ही सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

युजर्सच्या प्रायव्हसीचं काय?

WhatsApp च्या नव्या धोरणांमुळे युजर्सची प्रायव्हसी कायम राहणार नाही. WhatsApp आता युजर्सची इत्यंभूत माहिती ठेवणार आहे. प्रामुख्याने आपला आर्थिक डेटा साठवून ठेवला जाणार आहे. म्हणजेच आपल्या आर्थिक व्यावहारांवरुन आपण गरीब आहोत, श्रीमंत आहोत की मध्यमवर्गीय आहोत याची वर्गवारी केली जाणार आहे. त्यानुसारच आपल्याला सोशल मीडियावर जाहिराती दिसतील. (उदा. श्रीमंत युजर्सना त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर महागड्या गाड्या, गॅजेट्सच्या जाहिराती दिसतील). कंपनी आपल्या डेटाचा वापर करुन अधिक पैसे कमावणार आहे.

युजर्सचा डेटा शेअर होणार

WhatsApp च्या नव्या धोरणात स्पष्ट नमूद केलं आहे की, तुम्ही WhatsApp वर जो कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसिव्ह करत आहात त्याचा वापर रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लूझिव्ह, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रान्सफरेबल लायसन्स दिलं जात आहे. (Whatsapp Policy Share Personal data With facebook)

संबंधित बातम्या : 

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.