T20i World Cup 2026 : एकाला दुखापत तर दुसऱ्याला निराशाजनक कामगिरी भोवली, वर्ल्ड कपमधून 2 मॅचविनर आऊट
Icc T20i World Cup 2026 : क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. दुखापत आणि खराब कामगिरी या 2 कारणांमुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममधील 2 खेळाडूना आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला अवघा 1 आठवडा बाकी आहे. अशात आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता टी 20i वर्ल्ड कप निमित्ताने आयसीसी स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यावर दुखापतीमुळे भारत आणि श्रीलंकेत आयोजित 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून (Icc T20i World Cup 2026) बाहेर होण्याची वेळ ओढावली आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंतिम संघ निश्चित केला आहे. या संघात पॅटसह एकूण 2 बदल करण्यात आले आहेत.
पॅट कमिन्सचा दुखापतीमुळे ‘गेम’
पॅट गेल्या अनेक आठवड्यांपासून पाठीच्या दुखापतीसह झगडत होता. मात्र पॅट वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत फिट होईल, असा विश्वास टीम मॅनेजमेंटला होता. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची 31 जानेवारी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अखेर पॅट दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याचं जाहीर करावं लागलं. पॅटच्या जागी वेगवान गोलंदाज बेन ड्वारशुईस याचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
निराशाजनक कामगिरी भोवली
तसेच टीम मॅनेजमेंटने वर्ल्ड कप टीममधून एकाचा पत्ता कट केला आहे. मॅथ्यू शॉर्ट याच्या जागी मॅट रेनशॉ याचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. मॅथ्यूला खराब कामगिरीमुळे संघातून आपलं स्थान गमवावं लागलं.
“बेन ड्वारशुईस आणि मॅट रेनशॉ हे दोघे भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या वर्ल्ड कप स्पर्धेत चांगली कामगिरी करतील”, असा विश्वास ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे टोनी डोडमेड यांनी व्यक्त केला.
दोघेही नवखे
बेन ड्वारशुइस याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 13 टी 20i सामन्यांमध्ये 20 विकेट्स मिळवल्या आहेत. तर मॅट रेनशॉ याने फक्त 1 टी 20i सामना खेळला आहे. त्यामुळे दोघेही नवखे आहेत. मात्र आता हे दोघे संधी मिळाल्यास कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा झटका
Australia have been forced to shuffle their squad for the #T20WorldCup with a pair of changes confirmed to their 15-player group 👀
Details 👇https://t.co/yec6uXtzAV
— ICC (@ICC) January 31, 2026
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कर्णधार), झेव्हीयर बार्टलेट, कूपर कोनोली, टीम डेव्हीड, बेन ड्वारशुइस, कॅमरन ग्रीन, नाथन एलिस, ट्रेव्हीस हेड, जोश इंग्लिस, जोश हेजलवुड, मॅथ्यू कुन्हेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट रेनशॉ, मार्कस स्टोयनिस आणि एडम झॅम्पा.
