AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs New Zealand 5th T20I Score Updates : भारताने पाचवा सामना जिंकला, न्यूझीलंडवर 46 धावांनी दणदणीत विजय

| Updated on: Feb 01, 2026 | 4:39 AM
Share

India vs New Zealand 5th T20I Score Updates and Highlights in Marathi : टीम इंडिया न्यूझीलंडवर पाचव्या टी 20i सामन्यात शनिवारी 31 जानेवारीला मात केली. भारताचा हा या 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथा विजय ठरला. आता टीम इंडिया थेट टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

India vs New Zealand 5th T20I Score Updates : भारताने पाचवा सामना जिंकला, न्यूझीलंडवर 46 धावांनी दणदणीत विजय
India vs New Zealand 5th T20i Match Live Score and UpdatesImage Credit source: Tv9

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली आहे. भारताने न्यूझीलंडवर पाचव्या आणि अंतिम सामन्यात 46 धावांनी मात केली आणि मालिकेचा शेवट हा विजयाने केला. इशान किशन 103 आणि सूर्यकुमार यादव याच्या 63 धावांच्या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 271 धावा केल्या. मात्र त्यानंतर न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने न्यूझीलंडला 19.4 ओव्हरमध्ये 225 रन्सवर ऑलआऊट केलं. टीम इंडियासाठी अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. तर उपकर्णधार अक्षर पटेल याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. भारताचा हा या मैदानातील चौथा टी 20i विजय ठरला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 31 Jan 2026 10:30 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : भारताने पाचवा टी20 सामना 46 धावांनी जिंकला

    भारताने पाचव्या टी20 सामन्यात 46 धावांनी न्यूझीलंडला पराभूत केलं. या सामन्यात भारताने 272 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण न्यूझीलंडला 225 धावा करता आल्या. यासह मालिकेत 4-1 ने सरशी घेतली. यासह भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी रणशिंग फुंकलं आहे.

  • 31 Jan 2026 10:12 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : न्यूझीलंडला सातवा झटका, कायल जेमिसन आऊट, टीम इंडिया विजयाच्या दिशेने!

    भारताने न्यूझीलंडला सातवा झटता देत कायल जेमिसन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. अर्शदीपने सिंह याने कायल याला बोल्ड केलं. करायल याने 9 धावा केल्या.

  • 31 Jan 2026 09:53 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : न्यूझीलंडला पाचवा झटका, कॅप्टन मिचेल सँटनर आऊट, अर्शदीपकडून तिसरी शिकार

    अर्शदीप सिंह याने 12 व्या ओव्हरमधील कमाल केली आहे. अर्शदीपने रचीन रवींद्र याच्यानंतर कॅप्टन मिचेल सँटनर याला आऊट करत न्यूझीलंडला पाचवा झटका दिला आहे.

  • 31 Jan 2026 09:50 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : न्यूझीलंडला चौथा झटका, रचीन रवींद्र आऊट, टीम इंडियाचं जोरात कमबॅक

    टीम इंडियाने न्यूझीलंडला चौथा झटका देत जोरात कमबॅक केलं आहे. अर्शदीप सिंह याने रचीन रवींद्र याला 30 धावांवर अक्षर पटेल याच्या हाती कॅच आऊट केलं. यासह अर्शदीपने वैयक्तिक दुसरी विकेट मिळवली.

  • 31 Jan 2026 09:46 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : अक्षरकडून मोठी शिकार, ग्लेन फिलिप्स आऊट, न्यूझीलंडला तिसरा झटका

    अक्षर पटेल याने ग्लेन फिलिप्स याला स्वस्तात गुंडाळून न्यूझीलंडला तिसरा झटका दिला आहे. अक्षरने ग्लेन फिलिप्स याला 7 धावांवर रिंकू सिंह याच्या हाती कॅच आऊट केलं आणि आपली दुसरी विकेट मिळवली.

  • 31 Jan 2026 09:43 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : धोकादायक फिन एलन अखेर आऊट, अक्षर पटेलकडून शिकार, न्यूझीलंडला दुसरा झटका

    उपकर्णधार अक्षर पटेल याने धोकादायक फिन एलन याला आऊट करत भारताला हवी असलेली विकेट मिळवून दिली आहे. न्यूझीलंडने 17 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर एलनने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावलं.  फिनचा हा झंझावात असाच कायम होता. त्यामुळे टीम इंडिया विकेटच्या शोधात होती. अशात अक्षरने ही प्रतिक्षा संपवली. अक्षरने  फिन एलनला नवव्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर रिंकू सिंह याच्या हाती कॅच आऊट केलं. फिनने 38 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 8 फोरसह 80 रन्स केल्या.

  • 31 Jan 2026 09:21 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : फिन एलनची फटकेबाजी, न्यूझीलंडचं कमबॅक

    अर्शदीप सिंह याने टीम सायफर्ट याला आऊट करत न्यूझीलंडला 17 धावांवर पहिला झटका दिला. मात्र त्यानंतर फिन एलन याने रचीन रवींद्र याच्यासोबत फटकेबाजी करत न्यूझीलंडला सावरलं आहे. न्यूझीलंडने 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 66 धावा केल्या आहेत. फिन 46 तर रचीन 9 रन्सवर खेळत आहेत.

  • 31 Jan 2026 08:59 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : न्यूझीलंडला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका, टीम सायफर्ट आऊट

    अर्शदीप सिंह याने पहिल्याच ओव्हरमध्ये विकटे घेण्याची परंपरा न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या टी 20I सामन्यातही कायम ठेवली आहे. अर्शदीपने टीम सायफर्ट याला 5 धावांवर आऊट करत न्यूझीलंडला 17 धावांवर पहिला झटका दिला.

  • 31 Jan 2026 08:54 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 272 धावांचं आव्हान

    न्यूझीलंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 272 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडकडून टीम सेफर्ट आणि फिन एलन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 13 पेक्षा अधिक धावांची गरज आहे.

  • 31 Jan 2026 08:42 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : भारतीय फलंदाजांचा धमाका, न्यूझीलंड विरुद्ध 271 धावांचा डोंगर, गोलंदाजांची जोरदार धुलाई

    टीम इंडियाच्या फलंदाजांनी धमाका केला आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 271 धावा केल्या आहेत. भारतासाठी इशान किशन याने सर्वाधिक 103 धावा केल्या. त्याशिवाय कॅप्टन सूर्याने 63, हार्दिकने 42 आणि ओपनर अभिषेक शर्मा याने 30 धावा केल्या. आता न्यूझीलंड 272 धावांच्या प्रत्युत्तरात किती धावांपर्यंत मजल मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 31 Jan 2026 08:37 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : हार्दिकच्या वादळी खेळीचा अंत, भारताला पाचवा झटका

    जो येतोय तो फटकेबाजी करुन जातोय, भारतीय फलंदाजांनी अशी स्थिती न्यूझीलंडची पाचव्या टी 20i सामन्यात केली आहे. इशान, सूर्यानंतर हार्दिक पंड्या याने अवघ्या 17 चेंडूत 42 धावा ठोकल्या. हार्दिकने या खेळीत 4 षटकार आणि 1 चौकार लगावला.

  • 31 Jan 2026 08:26 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : इशान किशन शतकानंतर आऊट

    इशान किशन शतकी खेळीनंतर आऊट झाला आहे. भारताने यासह चौथी विकेट गमावली आहे. इशानने 43 बॉलमध्ये 103 धावा केल्या. इशानने या खेळीत 10 षटकार आणि 6 चौकार लगावले.

  • 31 Jan 2026 08:25 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : इशान किशनचा तडाखा, न्यूझीलंड विरुद्ध चाबूक शतक

    इशान किशन याने 17 व्या ओव्हरमध्ये षटकार ठोकत चाबूक अर्धशतक झळकावलं आहे. इशानने अवघ्या 42 चेंडूत  शतक झळकावलं आहे. इशानचं हे टी 20i क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक ठरलंय.

  • 31 Jan 2026 08:14 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : वादळी खेळीनंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट, भारताला तिसरा धक्का

    कर्णधार सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतकानंतरही तडाखा कायम ठेवत फटकेबाजी केली. मात्र याच फटकेबाजीच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव याच्या खेळीचा शेवट झाला. सूर्याने 30 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह 63 रन्सची खेळी केली.

  • 31 Jan 2026 08:07 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : सूर्यकुमारचा झंझावात, तिरुवनंतरपुरममध्ये चाबूक अर्धशतक

    इशान किशन याच्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही अर्धशतक झळकावलं आहे. सूर्याने 14 व्या ओव्हरमध्ये षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलंय. सूर्याने 26 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं.

  • 31 Jan 2026 07:59 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : इशानकडून इश सोढीची धुलाई, 12 व्या ओव्हरमध्ये 29 धावांची वसूली

    इशान किशन याने सामन्यातील 12 व्या ओव्हरमध्ये इश सोढी याच्या बॉलिंगवर धमाका केला आहे. इशानने सोढीच्या बॉलिंगवर तब्बल 29 धावांची वसूली केली. इशानने इशच्या बॉलिंगवर 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर 1 धाव भारताला अतिरिक्तद्वारे (वाईड) मिळाली.  इशान यासह 33 चेंडूत 75 धावांवर पोहचला.

  • 31 Jan 2026 07:55 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : इशान किशनची फटकेबाजी, न्यूझीलंड विरुद्ध अर्धशतक

    इशान किशन याने न्यूझीलंड विरुद्ध अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. इशानने 12 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर चौकार ठोकत कारकीर्दीतील आठवं अर्धशतक झळकावलं. इशानचं हे या मालिकेतील एकूण दुसरं अर्धशतक ठरलं.

  • 31 Jan 2026 07:48 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : इशान-सूर्या जोडीची फटकेबाजी, टीम इंडिया 100 पार

    इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. तसेच टीम इंडियाच्या 100 धावाही पूर्ण झाल्या आहेत. भारताने 10 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 102 धावा केल्या आहेत. सूर्या 27 आणि इशान 39 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 31 Jan 2026 07:41 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : इशान-सूर्या जोडी जमली, दोघांवर मोठी जबाबदारी

    न्यूझीलंडने टीम इंडियाच्या सलामी जोडीला झटपट आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. संजू सॅमसन 6 आणि अभिषेक शर्मा 30 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे भारताची धावसंख्या 5 ओव्हरनंतर 2 आऊट 48 अशी झाली. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या जोडीने भारताला सावरलं आहे. या दोघांनी नवव्या ओव्हरपर्यंत 24 बॉलमध्ये 34 रन्सची पार्टनरशीप केली आहे.

  • 31 Jan 2026 07:25 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : संजूनंतर अभिषेकही मैदानाबाहेर, भारताला दुसरा झटका

    लॉकी फर्ग्यूसन याने भारताच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. लॉकीने तिसऱ्या ओव्हरमध्ये संजू सॅमसन याला आऊट करत भारताला पहिला झटका दिला. त्यानंतर लॉकीने पाचव्या षटकांत अभिषेक शर्मा याला आऊट केलं. अभिषेकने 30 धावा केल्या.

  • 31 Jan 2026 07:17 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score Updates : भारताला पहिला झटका, संजू सलग पाचव्या सामन्यात ढेर, ओपनर घरच्या मैदानातही अपयशी

    टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन हा पाचव्या सामन्यातही अपयशी ठरला आहे. संजू तिसऱ्या ओव्हरमध्ये आऊट झालाय.  संजूच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. संजूने 6 बॉलमध्ये 6 रन्स केल्या.

  • 31 Jan 2026 07:15 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score : संजू-अभिषेक सलामी जोडीचा तडाखा, टीम इंडियाची फायर सुरुवात

    संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या भारताच्या सलामी जोडीने चाबूक सुरुवात केली आहे. या दोघांनी पहिल्या 2 ओव्हरमध्ये बिनबाद 29 धावा केल्या आहेत. अभिषेक 24 आणि संजू 5 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 31 Jan 2026 07:02 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Score : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, संजू-अभिषेक मैदानात

    टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय केला आहे. भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 31 Jan 2026 06:39 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Updates : न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन

    टीम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेव्हॉन जेकब्स, मिचेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन आणि जेकब डफी.

  • 31 Jan 2026 06:37 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

  • 31 Jan 2026 06:34 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Updates : टीम इंडियाने टॉस जिंकला, न्यूझीलंड विरुद्ध बॅटिंगचा निर्णय

    टीम इंडियाने पाचव्या टी 20i सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरुद्ध तिरुवनंतरपुरममधील या मैदानात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण आहे आणि कोण नाही? हे आपण जाणून घेऊयात.

  • 31 Jan 2026 06:11 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Updates : टी 20i मालिकेसाठी न्यूझीलंड टीम

    डेव्हॉन कॉनव्हे, टीम सेफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी, जेम्स नीशम, मायकेल ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन, बेव्हॉन जेकब्स आणि काइल जेमिसन.

  • 31 Jan 2026 06:10 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Updates : टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया

    अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, इशान किशन, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती.

  • 31 Jan 2026 06:00 PM (IST)

    IND vs NZ 5th T20I Live Updates : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

    टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. सामन्याचं आयोजन हे तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

Published On - Jan 31,2026 5:58 PM

Follow Us
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....