Maharashtra DCM Sunetra Pawar Swearing-in LIVE : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं महत्त्वाचं-छगन भुजबळ
Maharashtra New Deputy Chief Minister Sunetra Pawar Swearing-in Ceremony LIVE Updates in Marathi : आज दुपारी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यामध्ये एकमताने सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल.

LIVE NEWS & UPDATES
-
धुळ्यात गट स्थापन
धुळे महानगरपालिकेच्या महापौर निवडीच्या अगोदर शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट स्थापन करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी गट स्थापन करण्यात आला. महानगर प्रमुख संजय वाल्हे यांनी ही माहिती दिली. महापालिका निवडणुकीमध्ये युती करून निवडणूक लढवण्यात आली होती. महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाला ८ तर शिवसेनेला ५ जागा मिळाल्या होत्या
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?-छगन भुजबळांची प्रतिक्रिया काय
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय सगळ्यांच होता. त्यांना मुख्यमंत्री करणं महत्त्वाचं होतं. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात इतर निर्णय घेतले जातील असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
-
-
‘उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची एवढी घाई कशासाठी?’-शिवसैनिक
घरात एवढं दुःख असेल तर दहा दिवस शिव ओलांडत नाहीत तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला निघालात. सुनेत्रा पवार तुम्ही शपथ घेत असाल तरी महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला नाकारलं.मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार केला. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची एवढी घाई कशासाठी? अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या शिवसैनिक रेखा कोंडे यांनी दिली.
-
धुळे महानगरपालिकेच्या महापौर निवडीच्या अगोदर शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट स्थापन..
महानगर प्रमुख संजय वाल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीमध्ये युती करून निवडणूक लढवण्यात आली होती. महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाला आठ तर शिवसेनेला पाच जागा मिळाल्या होत्या. नाशिक विभागीय कार्यालयात शहर विकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेनेच्या वतीने गट स्थापन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीवर अंकुश ठेवण्यासाठी गटाची स्थापना करण्यात आली होती.
-
जळगावच्या फैजपूर येथील नगरपरिषदेच्या ४ काँग्रेस नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली
जळगावच्या फैजपूर येथील नगरपरिषदेच्या ४ काँग्रेस नगरसेवकांना जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षशिस्त मोडून भाजप उमेदवाराला पूरक भूमिका घेतल्याच्या आरोपावरून फैजपूर नगरपरिषदेच्या चार काँग्रेस नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. हकीम तडवी, सादेकाबी शेख दानिश, प्रियांका इंगळे आणि शेख इरफान या चार नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चारही नगरसेवकांना सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिले आहेत.
-
-
युगेंद्र पवार यांची अजित पवार यांच्यासाठी सोशल मीडिया वरती भावनिक पोस्ट…..
प्रिय अजितकाका, तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन. तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील. मिस यू अजितकाका…! अशा आशयाची योगेंद्र पवार यांच्याकडून सोशल मीडिया अजित पवार यांच्या प्रति भावना व्यक्त करणारी पोस्ट…
-
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकच्या रामकुंड गोदा घाट परिसरात पाहणी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यांच्या कामांना सुरुवात झाली असून मंत्री गिरीश महाजन यांनी मनपा युक्तांसमवेद पाहणी केली. पाहणी करत विकास कामांबद्दल माहिती घेतली. नाशिकच्या रामकुंड परिसरात कालपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. सिंहस्थाच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे.
-
-
अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप, थेट म्हणाले, तटकरे आणि पटेल…
तटकरे आणि पटेल त्यांच्या स्वार्थासाठी कोणत्याही स्थराला जाऊन शकतात, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
-
राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या मतदार संघात शोकसभा
राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या मतदार संघात शोकसभा. शोक सभेत सरोज अहिरे यांना अश्रू अनावर झाले आहेत. 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले.
-
अवकाळी पावसाने 5 हजार 686 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
जळगावच्या एरंडोल तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने ५ हजार ६८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान. एरंडोल तालुक्यात ५२ गावांतील ५ हजार ८७२ शेतकरी बाधित झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हातातोंडाशी आलेली गहू, मका व ज्वारी ही पिके आडवी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
-
नाशिकमध्ये 31 हजार विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक गीत
नाशिक शहरातील 81 शाळांमधील विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग. मंत्री गिरीश महाजन ही विद्यार्थ्यांच्या समूह गायनाला होते उपस्थित. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी ही उपस्थित. नाशिक शहरातील विविध 81 शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
-
शरद पवार योग्यच बोलत आहेत- संजय राऊत
शरद पवार योग्य बोलत आहेत, सुनेत्रा पवार यांच्याबद्दल कोणाच माहिती नाही, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
-
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पक्षाचा निर्णय- संजय राऊत
नुकताच बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.
-
पवार कुटुंबामध्ये वाद?
अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र, याची कल्पना शरद पवार यांना नाहीये. सुनेत्रा पवार कोणतीही चर्चा न करता थेट मुंबईला रात्री उशिरा पोहोचल्या.
-
खासदार सुप्रिया सुळे आज रात्रीच दिल्लीला जाणार
खासदार सुप्रिया सुळे आज रात्रीच दिल्लीला जाणार. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने सुप्रिया सुळे आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत.
-
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाली होती – शरद पवार
अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाली होती. त्यांच्यात चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो असे पवार यांनी स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता असा गौप्यस्फोटही शरद पवार यांनी केला.
-
रोहित पवार शरद पवार यांच्या भेटीस दाखल
बारामती – रोहित पवार, संदीप क्षीरसागर गोविंदबाग येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीस दाखल झाले आहेत.
-
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंदच, आम्हाला कुठली अडचण नाही – गिरीश महाजन
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमचा विषय नाही. दोन्ही पक्ष राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंदच, आम्हाला कुठली अडचण नाही – असं गिरीश महाजन म्हणाले. काय करायचं हे त्यांनी ठरवावं, सुनेत्रा वाहिनी आणि त्यांनी ठरवावे, असंही त्यांनी नमूद केलं.
-
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणारबाबत काय म्हणाले शरद पवार ?
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणारबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार – जयंत पाटील यांची विलीनीकरणाबाबात चर्चा झाली होती. विलीनीकरणाबाबत चर्चा होती, पण आता खंड पडला आहे – शरद पवार
-
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची मला माहितीच नाही – शरद पवार
सुनेत्रा पवार यांच्यासोबत कोणतीही चर्चा नाही. त्यांच्या शपथविधीची मला माहितीच नाही – शरद पवार
-
सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा निर्णय – शरद पवार
NCPने काय करावं हे त्यांनी ठरवलं, मी त्यावर भाष्य करणार नाही. तटकरे, प्रफुल्ल पटेल पक्षाचे प्रमुख, तो त्यांचा अधिकार आहे. सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे – शरद पवार
-
अजित पवार कर्तृत्ववान नेते होते – शरद पवार
अजित पवार कर्तृत्ववान नेते होते . अशी कर्तृत्ववान व्यक्ती सोबत नसणं, सोडून हा महाराष्ट्रावर सर्वात मोठा आघात आहे. कुटुंबावरही हा आघात आहे – शरद पवार
-
पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता
पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यातील ऊपमुख्यमंत्री केल्यानंतर राज्यसभेवर पार्थ पवार यांनी पाठवण्याची भाजपची तयारी असल्याचे सूत्रांनी सांगितलं.
-
नाशिक – अजित दादांच्या राष्ट्रवादी गटनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू
नाशिक – अजित दादांच्या राष्ट्रवादी गटनेतेपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. – हेमलता पाटील आणि सीमा ठाकरे यांच्यात गटनेते पदावरून रस्सीखेच. नाशिक महानगरपालिकेत अजित दादांच्या राष्ट्रवादीचे अवघे चार नगरसेवक आहेत. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादीची गट नोंदणी लांबणीवर पडली आहे. गटनेते पदासाठी हेमलता पाटील यांचे नाव अग्रस्थानी असल्याची चर्चा आहे.
-
रत्नागिरी – राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम मुंबईकडे रवाना
रत्नागिरी- राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम मुंबईकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांच्या बोलावलेल्या बैठकीला निकम उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांना मिळावे यासाठी बैठकीला उपस्थित राहणार. काल रात्री उशिरा राष्ट्रवादी कार्यालयाकडून निकम यांना आजच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी फोन आला होता. सावर्डे इथून शेखर निकम मुंबईतल्या बैठकीसाठी रवाना झालेत.
-
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदासह आणखी एक मोठी जबाबदारी
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदासह सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. अजित पवारांकडे असलेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार आपल्याकडेच ठेवणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता त्या अजित पवारांप्रमाणे दुहेरी जबाबदारी सांभाळणार आहेत.
-
दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक, होणार महत्वाचे निर्णय
आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार असून राष्ट्रवादीचा गटनेता निवडला जाणार आहे. गटनेता म्हणून सुनेत्रा पवारांची निवड करण्यात येईल. राष्ट्रवादीचे सर्व नेते, आमदार मुंबईच्या दिनेशेन रवाना झाले आहेत. संध्याकाळीशपथविधी होणार असून राजभवनात शपथविधीसाठी तयारी सुरू झाली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघतात अकस्मात निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. आज अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधीमंडळ बैठक पार पडणार असून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे.. त्यानंतर आज संध्याकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. . सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद या दोन्ही जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार, जय पवार पहाटेच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे…
Published On - Jan 31,2026 7:59 AM
