AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संत गुरु रविदास यांची जयंती : जालंधर येथील सचखंड बल्ला येथे PM मोदी यांची भेट, विविध कार्यक्रमाचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १ फेब्रुवारी २०२६ रोजी पंजाबचा दौरा आहे. दुपारी ३:४५ वाजता ते आदमपूर विमानतळाला भेट देणार आहेत. तेथे त्यांच्या हस्ते विमानतळाचे नवे नाव "श्री गुरु रविदास विमानतळ, आदमपूर" असे अनावरण होणार आहे. ते पंजाबमधील लुधियाना येथील हलवारा विमानतळावरील टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होणार आहे.

संत गुरु रविदास यांची जयंती : जालंधर येथील सचखंड बल्ला येथे PM मोदी यांची भेट, विविध कार्यक्रमाचे आयोजन
pm modi
| Updated on: Jan 31, 2026 | 7:17 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १ फेब्रुवारी २०२६ रोजी जालंधर जिल्ह्यातील डेरा सचखंड बल्लां येथे जाणार आहेत. ते येथे संत गुरु रविदास यांच्या ६४९ व्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर जाणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी येथे संत निरंजन दास यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाविनिमय करणार आहेत. त्यांना अलिकडेच पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान मोदी गुरु रविदास यांच्या सन्मानार्थ आयोजित एका समारंभात सहभागी होणार आहेत. सायंकाळी सुमारे साडे चार वाजता पंतप्रधान मंदिरात जाणार आहे.पीएम मोदी यांनी साल २०१९ मध्ये संत गुरु रविदास यांची जयंती संत निरंजन दासजी यांच्या उपस्थितीत काशी येथे साजरी केली होती.

सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान यांचे भाषण

पीएम मोदी संत गुरु रविदास यांच्या प्रतिमा आणि डेरा सचखंड बल्लांच्या दुसऱ्या गादीचे संत सरवन दास यांच्या मूर्तीवर फूले अर्पण करुन आदंराजली अर्पित करतील. यानंतर पीएम मोदी अरदास आणि प्रदक्षिणा घालतील.सायंकाळी ४.४५ वाजता ते व्यासपीठावर पोहचतील आणि सायंकाळी सुमारे ५ वाजता मोदी जनसभेला संबोधीत करतील.

pm modi

pm modi

संत गुरु रविदास यांची ६४९ व्या जयंतीच्या निमित्ताने आदमपूर एअरपोर्टचे नाव बदलून त्यास पूजनीय संत आणि समाज सुधारकाला सन्मान देणार आहेत.ज्यांची समानता, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेच्या शिकवणी भारताच्या सामाजिक मूल्यांना प्रेरणा देत आहेत.

PM MODI

PM MODI

पंजाबमध्ये एव्हीशन इंफ्रास्ट्रक्चरला आणखी पुढे नेले आहे. विमान वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये आणखी वाढ करून, पंतप्रधानांच्या हस्ते हलवारा विमानतळावर उद्घाटन करण्यात येणारी टर्मिनल इमारत राज्यासाठी एक नवीन प्रवेशद्वार स्थापित करेल, जी लुधियाना आणि त्याच्या आसपासच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करेल. लुधियाना जिल्ह्यात असलेले हलवारा हे भारतीय हवाई दलाचे एक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे स्टेशन देखील आहे.

नवा सिव्हील एन्क्लेव विकसित

लुधियानात आधी विमानतळावर अपेक्षापेक्षा छोटा रनवे होता. जो केवळ छोट्या विमानांसाठी योग्य होता. आता कनेक्टिव्हीटीत सुधारणा करुन आणखी मोठ्या विमानांसाठी हलवारा येथे एख नवा सिव्हील एन्क्लेव विकसित केला आहे,ज्यात एक मोठी धावपट्टी असून ती A320-प्रकारच्या विमानांच्या उड्डाणासाठी सक्षम असणार आहे.

pm modi news

pm modi news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सातत्य आणि पर्यावरणासंदर्भातील व्हिजन अनुरुप या टर्मिनलवर अनेक हरित आणि ऊर्जा कुशल सुविधांचा समावेश केला गेला आहे.यात एलईडी लायटिंग, इन्सुलेटेड छत, पर्जन्य जल संचयन प्राणाली, सिव्हेज आणि जल शुद्धीकरण यंत्र, लँडस्केपिंगसाठी रिसायकल पाण्याचा वापर सामील आहे. वास्तुकला डिझाईन पंजाबची समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवत आहे की एक विशिष्ट आणि क्षेत्रीय रुपाने प्रेरित प्रवासाचा अनुभव प्रदान करतो.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.