मोबाईल युजर्सच्या संख्येत 119.2 कोटींनी वाढ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या माहितीनुसार ऑक्टोबर 2018 पर्यंत देशात मोबाईल युजर्सची संख्या वाढली आहे. ही संख्या सध्या 119.2 कोटी इतकी वाढली असल्याचे सांगण्यात आलं आहे. रिलायन्स आणि बीएसएनएल सारख्या कंपनीच्या नवीन ग्राहकांची संख्या वाढली आहे. ट्रायच्या अंकानुसार ऑक्टोबरमध्ये जिओ आणि बीएसएनएलच्या मोबाईल ग्राहकांची संख्या 1.08 कोटी होती. तर वोडाफोन, आयडीया, भारती एअरटेल, […]

मोबाईल युजर्सच्या संख्येत 119.2 कोटींनी वाढ
व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवीन फीचर 'स्टोरेज अँड डेटा' च्या या पर्यायाच्या खाली 'स्टोरेज मॅनेज' अशा पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे. यासाठी एक नवीन स्टोरेज बार तयार करण्यात आला आहे.
Follow us on

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या माहितीनुसार ऑक्टोबर 2018 पर्यंत देशात मोबाईल युजर्सची संख्या वाढली आहे. ही संख्या सध्या 119.2 कोटी इतकी वाढली असल्याचे सांगण्यात आलं आहे. रिलायन्स आणि बीएसएनएल सारख्या कंपनीच्या नवीन ग्राहकांची संख्या वाढली आहे. ट्रायच्या अंकानुसार ऑक्टोबरमध्ये जिओ आणि बीएसएनएलच्या मोबाईल ग्राहकांची संख्या 1.08 कोटी होती. तर वोडाफोन, आयडीया, भारती एअरटेल, टाट टेलीसर्व्हिसेस, एमटीएनएल आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या ग्राहकांची संख्या 1.01 कोटींनी घसरली आहे.

या दरम्यान रिलायन्सने एक कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना जोडले आहे. तसेच बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या 3.66 लाखांनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये वोडाफोन आणि आयडीयाने 73.61 लाख ग्राहक, एअरटेल ने 18.64 लाख, एमटीएनएल ने 8,068 आणि रिलायन्स कम्युनिकेशनने 3,831 ग्राहकांना गमावले आहे. ट्रायच्या रिपोर्टनुसार ऑक्टोबरमध्ये देशात मोबाईल उपभोक्त्यांची संख्या 119.2 कोटींवर गेली आहे. जी सप्टेंबरमध्ये 119.14 कोटी होती.

लँडलाईन ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. ऑक्टोबरमध्ये बीएसएनएलचे 85,200 फिक्स्ड लाईन ग्राहक कमी झाले. तर रिलायन्स कम्युनिकेशनचे 14,120, एमटीएनएलचे 8,684, टाटा टेलीसर्व्हिसेसचे 3,398 फिक्स्ड लाईन ग्राहकांमध्ये घट झाल्याने कंपनीला मोठे नुकसान झाले. भारती एअरटेल आणि वोडाफोनच्या फिक्सड लाईन ग्राहकांची संख्या ऑक्टोबरमध्ये अनुक्रमे 16,340 आणि 8,894 ने वाढली आहे. देशात ब्रॅडबाँड सेवा देणाऱ्या 306 सेवा प्रदानकर्त्यां ग्राहकांची संख्या ऑक्टोबरमध्ये तीन टक्क्यांनी वाढून 49.61 कोटी झाली आहे. तर सप्टेंबरमध्ये 48.17 कोटी होती.