2018 मधील सर्वात खराब पासवर्ड

मुंबई : जगातील सर्वात खराब पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर यामध्ये सलग दुसऱ्यावर्षी ‘123456’ हा पासवर्ड टॉपवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर हा ‘Password’ पासवर्ड आहे. पासवर्ड मॅनेजमेंट कंपनीने नुकतेच 25 सगळ्यात खराब पासवर्डची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करण्यापूर्वी कंपनीने जगभरातील पन्नास लाखांपेक्षा जास्त अकाउंटसचे संशोधन केले होते. यामध्ये  दहा टक्के लोक […]

2018 मधील सर्वात खराब पासवर्ड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : जगातील सर्वात खराब पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर यामध्ये सलग दुसऱ्यावर्षी ‘123456’ हा पासवर्ड टॉपवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर हा ‘Password’ पासवर्ड आहे. पासवर्ड मॅनेजमेंट कंपनीने नुकतेच 25 सगळ्यात खराब पासवर्डची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करण्यापूर्वी कंपनीने जगभरातील पन्नास लाखांपेक्षा जास्त अकाउंटसचे संशोधन केले होते. यामध्ये  दहा टक्के लोक सर्वात खराब पासवर्डचा वापर करतात असे दिसून आले.

बरेचजण पासवर्ड लक्षात राहण्यासाठी अगदी साध्या सोप्या शब्दांचा वापर करतात. पण यामुळे, याचा फटका आपल्याला बसु शकतो. आजच्या युगात डिजीटल माध्यमाला जास्त महत्व आले आहे. त्यासोबतच सर्वाधिक यूजर आज मेल, फेसबुकचा वापर करतात. यामध्ये आपल्या वैयक्तिक गोष्टींचाही समावेश असतो. जर आपल्या खराब पासवर्डमुळे अकाउंट हॅक झाले तर याचा वाईट परिणाम घडू शकतो.

ही यादी जाहीर केल्यावर कंपनीने सर्व यूजर्सला सल्ला दिला आहे की, यूजरने नेहमी वेगवेगळ्या अकाउंटसाठी वेगवेगळ्या पासवर्डचा वापर करावा. कारण हॅकर्सला एका अकाउंटसचा पासवर्ड मिळाला तर तो तुमचे इतर अकाउंटसही हॅक करु शकतो. यंदाच्या टॉप 25 च्या यादीत 11 पासवर्डचा नव्याने समावेश आहे.

यामध्ये iloveyou पासवर्डचाही समावेश आहे. सलग दुसऱ्यावर्षी iloveyou पासवर्ड दहाव्या क्रमांकावर आहे. बऱ्याच युजर्सने साध्या पासवर्डचा वापर केलेला आहे. अशा प्रकारचे पासवर्ड हॅकर्स सहज पकडू शकतात. यावर्षी सर्वात जास्त 123456 या पासवर्डचा वापर करण्यात आला आहे. तसेच princess, password, sunshine, qwerty सारखे पासवर्ड वापरले आहेत.

पोजिशन        2018

  1. 123456
  2. Password
  3. 123456789
  4. 12345678
  5. 12345
  6. 111111
  7. 1234567
  8. Sunshine
  9. Qwerty
  10. Iloveyou
  11. Princess
  12. Admin
  13. Welcom
  14. 666666
  15. Abc 123
  16. Fotball
  17. 123123
  18. Monkey
  19. 654321
  20. !@#$%^&*
  21. Charlie
  22. aa 123456
  23. donald
  24. password1
  25. qwerty123
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.