6 हजारपेक्षा कमी किमतीत सर्वात स्वस्तात मिळतोय ‘हा’ अँड्रॉइड फोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

तुम्ही जर 6000 पेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन शोधत असाल तर Ai+ Pulse हा तुमचा पर्याय असू शकतो. टचस्क्रीन असलेल्या या परवडणाऱ्या अँड्रॉइड फोनमध्ये पॉवरफूल बॅटरी आणि अनेक फिचर्स आहेत. चला जाणून घेऊया या फोनमध्ये तुम्हाला कोणते खास फीचर्स मिळतील.

6 हजारपेक्षा कमी किमतीत सर्वात स्वस्तात मिळतोय हा अँड्रॉइड फोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
This Ai Plus cheapest Android phone launched at less than 6000 thousand know its price and features
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 03, 2025 | 12:16 PM

तुम्ही जर 6 हजार रूपयांच्या बजेटमध्ये नवीन अँड्रॉइड फोन शोधत असाल पण तुम्हाला कोणताही पर्याय सापडत नसेल तर चिंता करू नका. कारण आज आपण 6,000 रूपयांपेक्षा स्वस्त असलेला स्मार्टफोनबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5000 mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. तर कमी किमतीत लाँच करण्यात आलेल्या या हँडसेटचे नाव Ai+ Pulse आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत किती आहे आणि त्याचे फिचर्स जाणून घेऊयात.भारतातील एआय+ पल्सची किंमत

 

जुलैमध्ये लाँच झालेला हा बजेट स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 4 जीबी/64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 5,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन काळा, निळा आणि हिरवा या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Poco C71 किंमत 5,599 रुपये आणि HMD Touch 4G किंमत 4,399 रुपये असलेल्या या फोनशी स्पर्धा करेल.

एआय+ पल्स स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: या परवडणाऱ्या फोनमध्ये 6.7-इंचाचा एचडी+ रिझोल्यूशन डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये Unisoc T615 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज: हा फोन दोन रॅम आणि स्टोरेज प्रकारांमध्ये येतो: जीबी/64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज. तुम्ही मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज सहजपणे 1 टीबी पर्यंत वाढवू शकता.

कॅमेरा सेटअप: या हँडसेटमध्ये 50 मेगापिक्सेल एआय ड्युअल रियर कॅमेरा सेन्सर आहे, तर 5-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर फ्रंटला उपलब्ध असेल.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 18 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 एमएएचची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटी: या बजेट फोनमध्ये 4G सपोर्ट, GPS, Wi-Fi, USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. सुरक्षेसाठी या परवडणाऱ्या फोनमध्ये पॉवर बटणमध्ये एका बाजूला बसवलेला फिंगरप्रिंट सेन्सर आहे.