AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp ची ही मोफत सेवा होणार बंद, खिशाला बसू शकते चाट

WhatsApp | व्हॉटसॲप युझर्ससाठी महत्वाची बातमी आहे. यंदा वापरकर्त्यांन मोफत मिळणारी ही सेवा बंद होण्याची शक्यता आहे. याविषयी गुगलने पण अगोदरच संकेत दिले आहेत. व्हॉटसॲपवर जास्तीत जास्त वापरकर्ते त्यांच्या चॅटचा बॅकअप क्लाऊड स्टोरेजवर सेव्ह करतात. सध्या ही सेवा मोफत आहे.

WhatsApp ची ही मोफत सेवा होणार बंद, खिशाला बसू शकते चाट
| Updated on: Jan 09, 2024 | 1:59 PM
Share

नवी दिल्ली | 9 जानेवारी 2024 : WhatsApp ही जगभरात वापरले जाणारे मॅसेजिंग ॲप  आहे. कोट्यवधी युझर्स या ॲपवर दररोज एकमेकांना मॅसेज पाठवतात. जास्तीत जास्त युझर्स मोफत त्यांची चॅट, फोटो आणि व्हिडिओचे बॅकअप घेतात. हे बॅकअप गगुलच्या क्लाऊड स्टोरेजवर सेव्ह असते. पण ही बॅकअपची सेवा अधिक काळ मोफत नसेल. त्यासाठी युझर्सला यावर्षात पैसे मोजावे लागू शकतात. गुगलने याविषयीचे संकेत अगोदरच दिले आहेत. याविषयीचा निर्णय अजून जाहीर करण्यात आला नाही.

काय होईल बदल

वर्ष 2023 मध्ये गुगलने एक महत्वाची माहिती दिली होती. त्यामध्ये व्हॉट्सॲपमध्ये लवकरच होणाऱ्या बदलाची माहिती देण्यात आली होती. या बदलामुळे युझर्स गुगल ड्राईव्हवर मोफत मिळणारी अमर्यादीत जतन करण्याची सेवा बंद होईल. एकदा स्पेस भरल्यानंतर क्लाऊड स्टोरेजसाठी युझर्सला पेमेंट करावे लागेल. अथवा त्याचा महत्वाचा डेटा डिलिट करावा लागेल. त्यासाठी व्हॉट्सॲपने पण तयारी केली आहे.

सध्या मोफत

गुगल ड्राईव्हवर युझर्सला 15GB डेटा मोफत मिळतो. सध्या व्हॉटसॲप युझर्स त्यांना हवा तितका बॅकअप घेतले तरी त्यांना अडचण नव्हती. हा नियम यावर्षापासून बदलला आहे. पण 15GB डेटाबाबतचे धोरण कधीपासून अंमलात येईल याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जो डेटा गरजेचा नाही, तो युझर्सला डिलीट करावा लागेल. तसेच बॅकअप घेताना स्मार्टनेस दाखवावी लागेल. त्याला नाहकचा डेटा डिलीट करावा लागेल. बॅकअप घेताना गरजेचा डेटा डिलीट करावा लागेल. तर त्याचे स्टोरेज लगेचच भरणार नाही.

अतिरिक्त स्टोरेजसाठी करावे लागेल पेमेंट

गुगल ड्राईव्ह वर अतिरिक्त स्टोरेज एक्सेस करण्यासाठी पेमेंट करावे लागते. त्यासाठी गुगलचा वन प्लॅन आहे. युझर्स त्यांच्या गरजेनुसार स्टोरेजचा पर्याय निवडू शकतात. गुगलचा मासिक आणि वार्षिक प्लॅन आहे. या दोन्ही श्रेणीत तीन-तीन प्लॅन आहेत. मासिक बेसिक प्लॅनमध्ये 100GB डेटा मिळतो. त्यासाठी युझर्सला 35 रुपये प्रति महिना द्यावा लागतो. हा प्लॅन तीन महिन्यांसाठी आहे. त्यानंतर त्याला या सेवेसाठी 130 रुपये मोजावे लागतील.

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.