जिओ फायबर युझर्सला अनलिमिटेड इंटरनेट मिळणार, 5 सप्टेंबरपासून कंपनीकडून फ्री ट्रायल

| Updated on: Sep 04, 2020 | 3:19 PM

जिओ फायबर आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड इंटरनेट ऑफर देत आहे (Jio fiber New Plan).

जिओ फायबर युझर्सला अनलिमिटेड इंटरनेट मिळणार, 5 सप्टेंबरपासून कंपनीकडून फ्री ट्रायल
Follow us on

मुंबई : जिओ फायबर आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड इंटरनेट ऑफर देत आहे (Jio fiber New Plan). जिओ फायबर या ऑफरची फ्री ट्रायल 5 सप्टेंबरपासून युझर्सला देणार आहे. यामध्ये अपग्रेडेड डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग स्पीड दिला जाणार आहे. या प्लानमुळे युझर्सला स्पीडमध्ये इंटरनेट मिळणार आहे (Jio fiber New Plan).

या नवीन अपग्रेडेड प्लानमध्ये युझर्सला स्पीडमध्ये डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग मिळणार आहे. ग्राहकांना कंपनीकडून एसएमएसद्वारे या प्लानबाबत माहिती दिली जाणार आहे. काही युझर्सने ट्वीट करत म्हटले की, कंपनीकडून त्यांना याबद्दल मेसेज आला आहे.

या ऑफरचा वापर करण्यासाठी ग्राहकांना आपल्या येणाऱ्या बिलामध्ये ट्रायल फॅसिलिटीचा पर्याय निवडावा लागणार आहे. ऑफर अपग्रेड करण्यासाठी युझर्सला नवीन प्लान निवडावा लागणार आहे. उदाहरण म्हणजे, जर तुम्ही 849 रुपये प्रति महीन्याचा सिल्वर प्लान वापरत असाल आणि हा प्लान अपग्रेड करायचा आहे. तर तुम्ही नवीन गोल्ड प्लान निवडू शकता. यासाठी तुमच्याकडून प्रति महिना 999 रुपये चार्ज केले जातील. प्लान अपडेट केल्यानंतर युझर्सला अनलिमिटेड इंटरनेट दिले जाईल.

जर तुम्ही एकदा प्लान अपग्रेड केला तर जिओ फायबर युझर्स जुना प्लॅन पुन्हा अॅक्टिव्ह करु शकत नाही.

दरम्यान, यापूर्वीही जिओने 399 रुपयांचा ब्रॉडबँड प्लानची घोषणा केली होती. या ब्रॉडबँड प्लानमध्ये युझर्सला अनलिमिटेड इंटरनेट ऑफर दिली जात होती.

संबंधित बातम्या :

जिओच्या ग्राहकांना खास सुविधा, 5000 GB पर्यंत एक्स्ट्रा डेटा आणि बरंच काही

‘कोरोना’ची लक्षणं एका क्लिकवर तपासा, रिलायन्स जिओचे ‘Corona Symptoms Checker’ अॅप