मुंबईनंतर ‘या’ शहरातही Vodafone Idea ची 5G सेवा सुरु, फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड डेटा

व्होडाफोन आयडियाने देशातील आणखी एका मोठ्या शहरात 5G सेवा सुरू केली आहे. या शहरातील लाखो वापरकर्ते आता व्होडाफोन-आयडियाच्या 5G सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

मुंबईनंतर या शहरातही Vodafone Idea ची 5G सेवा सुरु, फक्त इतक्या रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड डेटा
vi 5G
| Updated on: Jun 11, 2025 | 6:54 PM

व्होडाफोन आयडियाने मुंबई, दिल्ली, चंदीगड आणि पटना नंतर देशातील आणखी एका मोठ्या शहरात 5G सेवा सुरू केली आहे. खराब आर्थिक परिस्थितीमुळे कंपनीने आपली 5G सेवा सुरू करण्यास विलंब केला होता. मात्र आता सुमारे दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कंपनीने देशातील विविध टेलिकॉम सर्कलमध्ये आपली 5G सेवा सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

‘या’ शहरात सेवा सुरू झाली

उत्तर आणि पश्चिम भारतानंतर व्होडाफोन-आयडिया कंपनीने आता दक्षिण भारतातील बेंगळुरूमध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. आता बेंगळुरू शहरातील लाखो वापरकर्ते आता व्होडाफोन-आयडियाच्या 5G सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

१७ टेलिकॉम सर्कलमध्ये आपली 5G सेवा सुरू होणार

मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये, जिओ आणि एअरटेलसह, व्होडाफोन-आयडियाने देखील 5G ​​स्पेक्ट्रम खरेदी केला होता. मात्र खराब आर्थिक परिस्थिती आणि AGR थकबाकीमुळे कंपनीने आपली 5G सेवा सुरू करण्यास विलंब केला आहे.या वर्षाच्या अखेरीस देशातील १७ टेलिकॉम सर्कलमध्ये आपली 5G सेवा सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सध्या दिल्ली-एनसीआर, मुंबई, चंदीगड, पटना आणि बेंगळुरू येथे 5G सेवा उपलब्ध आहे. 5G सपोर्ट करणारे डिव्हाइस असलेले युजर्स 5G सेवांचा लाभ घेत आहेत.

कोट्यवधी लोकांना फायदा होणार

सध्या देशातील 99% जिल्ह्यांमध्ये 5G सेवा पुरवली जात आहे. त्यामुळे भारतात 5G मोबाइल वापरकर्त्यांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. आता व्होडाफोन-आयडियाच्या 5G सेवा सुरू केल्याने कोट्यवधी वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. व्होडाफोन-आयडिया व्यतिरिक्त बीएसएनएलही लवकरच ५जी सेवेची चाचणी सुरू करण्याची शक्यता आहे.

व्होडाफोन-आयडियाचा प्लॅन २९९ रुपयांपासून सुरू होणार

व्होडाफोन-आयडियाचे 5जी रिचार्ज प्लॅन २९९ रुपयांपासून सुरू होत आहे. २८ दिवसांच्या या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंगसह अनलिमिटेड ५जी डेटा दिला जात आहे. याशिवाय वापरकर्त्यांना दररोज १ जीबी ४जी डेटा आणि १०० मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळत आहे.