Whatsapp वर व्हिडीओ शेअर करता? तुमच्यासाठी कंपनीने नवं फिचर आणलंय

| Updated on: Nov 19, 2020 | 6:20 PM

युजर्सच्या मागणीनंतर आता Whatsapp ने नवीन अपडेट आणलं आहे. हे अपडेट Whatsapp वर शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडीओंशी संबंधित आहे.

Whatsapp वर व्हिडीओ शेअर करता? तुमच्यासाठी कंपनीने नवं फिचर आणलंय
Follow us on

मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून Whatsapp त्यांच्या युजर्ससाठी सातत्याने नवनवे फिचर्स लाँच करत आहे. युजर्सच्या गरजेनुसार आणि मागणीनुसार कंपनी त्यांचं अ‍ॅप सातत्याने अपडेट करत आहे. युजर्सच्या मागणीनंतर आता कंपनीने नवीन अपडेट आणलं आहे. हे अपडेट Whatsapp वर शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडीओंशी संबंधित आहे. या नव्या अपडेटमुळे युजर्स आता Whatsapp वर कोणालाही व्हिडीओ पाठवताना अथवा व्हिडीओ स्टेटसवर ठेवताना त्यामध्ये बदल करु शकतात. (Whatsapp will allow users to Mute Videos before sending new mute videos feature in testing says WABetaInfo)

Whatsapp मध्ये होणारे बदल आणि बीटा अपडेट्सना मॉनिटर करणाऱ्या WABetaInfo ने याबाबत म्हटले आहे की, लवकरच युजर्सना व्हिडीओज शेअर करताना आणि स्टेटसवर अपलोड करताना तो व्हिडीओ ‘Mute’ करता येणार आहे. ‘Mute Video’ असं या नव्या फिचरचं नाव असू शकतं. WABetaInfo ने याबाबतचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे, त्यामध्ये व्हिडीओ ट्रिमिंगच्या पर्यायासह म्युट व्हिडीओ असा पर्यायही स्पष्ट दिसतोय.

Whatsapp मध्ये नुकतंच डिसअ‍ॅपियरिंग मेसेजेस (Disappear Messages) आणि अ‍ॅडव्हान्स्ड वॉलपेपर फिचर रोलआऊट करण्यात आलं आहे. त्यानंतर कंपनी आता नव्या फिचरवर काम करत आहे. WABetaInfo ने म्हटलं आहे की, लवकरच युजर्ससाटी Muting Videos हे नवं फिचर रोलआऊट केलं जाऊ शकतं. या फिचरच्या सहाय्याने युजर्स Whatsapp वर कोणालाही व्हिडीओ पाठवताना अथवा व्हिडीओ स्टेटसवर ठेवताना तो व्हिडीओ म्युट करु शकतात. सध्या या फिचरचं टेस्टिंग सुरु आहे. बीटा टेस्टिंगनंतर हे फिचर रोलआऊट केलं जाऊ शकतं.

व्हॉट्सअ‍ॅपमधील हो फिचर्स वापरता का?

5MB पेक्षा मोठ्या फाईल्स कशा डिलीट करायच्या?

तुमच्या फोनमधील स्टोरेज स्पेस कमी आहे किंवा तुमची स्टोरेज स्पेस भरली आहे, तर तुम्ही 5 एमबीपेक्षा मोठ्या आकाराच्या फाईल्स डिलीट करायला हव्यात. यासाठी तुम्हाला सेटिंग्स – स्टोरेज, डेटा आणि मॅनेज स्टोरेजमध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल की, 5 एमबीपेक्षा मोठ्या फाईल डिलीट करा. त्यावर क्लिक करुन तुम्ही 5 एमबीपेक्षा मोठ्या आकाराच्या सर्व फाईल्स डिलीट करु शकता. याद्वारे तुम्ही तुमचा वेळ आणि मोबाईलमधील स्टोरेज स्पेस वाचवू शकता. WhatsApp ने हे फिचरच नुकतंच रोलआऊट केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या सर्व ऑडिओ/व्हिडीओ फाईल्स कशा शोधायच्या?

यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअॅपवरील सर्च बारवर क्लिक करा. तिथे तुम्हाला मेन्शंड असा पर्याय दिसेल. तिथे तुम्ही कोणालाही सिलेक्ट करु शकता. आता तुम्हाला फोटो, जिफ किंवा इतर फाईल्सची लिस्ट दिसेल.

संबंधित बातम्या

Whatsapp पेमेंट्सचा वापर करणार आहात? त्याआधी ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा

WhatsApp द्वारे शॉपिंग करा! नवं फिचर येतंय

(Whatsapp will allow users to Mute Videos before sending new mute videos feature in testing says WABetaInfo)