
आजच्या डिजिटल युगात यूट्यूब हा फक्त व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म न राहता एक भक्कम करिअर पर्याय बनला आहे. भारतात अनेक अशा यूट्यूबर्सनी केवळ लोकप्रियताच नाही, तर कोटींची कमाईही केली आहे. त्यात दोन मोठी नावं म्हणजे Technical Guruji आणि BB Ki Vines. हे दोघंही वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटसाठी प्रसिद्ध आहेत, पण एक प्रश्न सर्वांनाच पडतो शेवटी यूट्यूबवरून जास्त पैसे कोण कमावतो?
गौरव चौधरी, ज्यांना सगळे Technical Guruji या नावाने ओळखतात, हे यूट्यूबवर टेक्नोलॉजीशी संबंधित व्हिडिओ बनवतात. स्मार्टफोन रिव्ह्यू, गॅजेट्स अनबॉक्सिंग, टेक न्यूज आणि तांत्रिक टिप्स देणं हे त्यांच्या चॅनेलचं मुख्य वैशिष्ट्य आहे. हिंदी भाषेत कंटेंट देत असल्यामुळे त्यांना भारतीय प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा लाभलेला आहे.
सबस्क्राईबर्स: 2.3 कोटीहून अधिक
प्रत्येक व्हिडिओवर सरासरी व्यूज: लाखोंच्या घरात
कमाईचे स्रोत: यूट्यूब अॅड रेवन्यू, सॅमसंग व शाओमीसारख्या ब्रँड डील्स, अॅफिलिएट मार्केटिंग, स्पॉन्सर्ड कंटेंट
कमाई: दरमहा अंदाजे 30 ते 40 लाख रुपये
स्थान: गौरव सध्या दुबईत राहतात आणि तिथूनच आपला चॅनेल चालवतात
भुवन बाम, ज्यांना यूट्यूबवर BB Ki Vines म्हणून ओळखलं जातं, हे भारतातील पहिल्या कॉमेडी यूट्यूबर्सपैकी एक आहेत. ‘बबलू’, ‘बंछोड़ा’, ‘समीर फुद्दी’ अशा पात्रांद्वारे ते प्रेक्षकांचे मन जिंकतात. या सर्व भूमिका ते स्वतःच करतात.
सबस्क्राईबर्स: 2.6 कोटीहून अधिक
प्रत्येक व्हिडिओवर सरासरी व्यूज: कोटींच्या घरात
कमाईचे स्रोत: यूट्यूब अॅड रेवन्यू, लाईव्ह शो, म्युझिक व्हिडिओज, वेब सिरीज, ब्रँड कोलॅब (Tissot, Lenskart इ.)
कमाई: दरमहा अंदाजे 40 ते 50 लाख रुपये
इतर प्लॅटफॉर्म्स: म्युझिक अल्बम्स आणि OTTवरदेखील सक्रिय
दोघंही आपल्या जागी श्रेष्ठ आहेत. गौरव टेक जगतातला महारथी आहे, तर भुवन आपल्या भावनिक व विनोदी शैलीने लोकांच्या मनात घर करून बसलाय. पण कमाईच्या बाबतीत पाहिलं, तर भुवन बाम थोडा पुढे आहे. कारण त्याचे उत्पन्नाचे स्रोत अधिक आहेत वेब सिरीज, संगीत, ब्रँड डील्स आणि इव्हेंट्स यांचा समावेश आहे. तसंच, त्याचे पात्र आणि कथा प्रेक्षकांशी भावनिक नातं तयार करतात.
एकांदरीत काय, गौरव चौधरी माहिती देणाऱ्या क्षेत्रात आघाडीवर असून, त्याचं कंटेंट अत्यंत उपयुक्त आहे. तर भुवन बाम प्रेक्षकांना हसवून त्यांचं मनोरंजन करतो. दोघंही भारतीय डिजिटल स्पेसमध्ये प्रभावशाली व्यक्तिमत्व आहेत. पण आजच्या घडीला यूट्यूबचा ‘डिजिटल दबदबा’ जर कुणाचा आहे, तर तो BB Ki Vines चाच असल्याचं स्पष्ट होतं.