X च्या CEO लिंडा याकारिनो सोशल मीडियावर झाल्या ट्रोल, पाहा काय प्रकरण

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटरला अब्जाधीश इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यानंतर या कंपनीत अनेक बदल केले. कंपनीचे नाव 'एक्स' करुन टाकले, आता या कंपनीच्या सीईओ लिंडा एका वेगळ्याच कारणाने ट्रोल झाल्या आहेत.

X च्या CEO लिंडा याकारिनो सोशल मीडियावर झाल्या ट्रोल, पाहा काय प्रकरण
linda yaccarino
Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 29, 2023 | 8:12 PM

मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणाऱ्या इलॉन मस्क यांनी ट्वीटर ( Twitter ) कंपनी विकत घेतली. त्यानंतर त्यांना या कंपनीला फायद्यात आणण्यासाठी निरनिराळे उपाय करुन पाहीले. आपल्या कर्मचाऱ्यांची गच्छंती केली. नंतर कंपनीचे नावच बदलून ‘एक्स’ असे करुन टाकले. आता एक्स X कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो यांना समाजमाध्यमांवर ट्रोल केले जात आहे. या मागे त्यांच्या एका कार्यक्रमातील फोटोला एका युजरने एक्सवरच शेअर केल्याने गोंधळ उडाला आहे. काय नेमका प्रकार पाहा…

द वर्जच्या वृत्तानूसार वॉक्स मिडीयाच्या कोड 2023 परिषदेतील एका मुलाखतीत एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी प्रक्षेकांना आपला आयफोन डीस्प्ले दाखविला. त्यानंतर हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला. कारण त्यांच्या कंपनी एक्सचे एप होम स्क्रिनच्या पहील्या पेजवर नव्हते. त्याचवेळी तेथे फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल आणि अन्य कंपन्यांचे प्रसिद्ध एप मात्र दिसत आहेत. एवढेच काय तर सीईओच्या फोनवर सिग्नल एप देखील दिसत आहे. त्यामुळे त्यांना चांगलेच ट्रोल केले जाते.

आयफोन होम स्क्रीनला कस्टमाईज करून अनेक पर्याय मिळतात. खास करुन IOS 14 च्या होम स्क्रीनच्या व्हीजिटनंतर युजर अनेक पेज मॅनेज करु शकतात. आणि एप लायब्ररीत लपवू देखील शकतात. परंतू पहिले होम स्क्रीन पेजवर सर्वात उपयोगी एप्स दिसावे अशी सेटींग आपण करतो. आश्चर्य म्हणजे कंपनीचे स्वत:चे एप मात्र सीईओ लिंडा यांच्या पसंतीच्या यादीत नाही.

ही पाहा पोस्ट ज्यावरुन लिंडा झाल्या ट्रोल –

सोशल मिडीयावर ट्रोल

एका एक्स युजर अरिन वायचुलीस यांनी एक्स सीईओ याकारिनो यांच्या या फोटोला एक्सवर शेअर केले आहे. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिली आहे की ‘वेट, ट्वीटर त्यांच्या होम स्क्रीनवर देखील नाही’ या पोस्टला आतापर्यंत 31 हजार लोकांनी पाहीले आहे. आपण ज्या सोशल मिडीया कंपनीची धुरा सांभाळत आहोत निदान त्या कंपनीचे मोबाईल एप आपल्या स्वत:च्या फोनमध्ये असावे ही किमान अपेक्षा असते. मात्र त्यांनी हा नियम पाळला नाही त्यामुळे त्या ट्रोल झाल्या आहेत.