भारतात शाओमीचे वायरलेस हेडफोन लाँच होणार

| Updated on: Jul 01, 2019 | 10:30 PM

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी आपल्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त भारतात अनेक प्रोडक्ट लाँच करत आहे. या महिन्यात कंपनी रेडमी के20 सीरिजचे स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे.

भारतात शाओमीचे वायरलेस हेडफोन लाँच होणार
Follow us on

मुंबई : चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी आपल्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त भारतात अनेक प्रोडक्ट लाँच करत आहे. या महिन्यात कंपनी रेडमी के20 सीरिजचे स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. यासोबतच कंपनी शाओमी रेडमी 7A पण लाँच करत आहे.

विशेष म्हणेज शाओमी येत्या 15 जुलै रोजी आपला वायरलेस हेडफोनही लाँच करणार आहे. नुकतेच शाओमीने Mi Beard Trimmer भारतात लाँच केले. ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India च्या लिस्टिंगनुसार Amazon Prime Days ला शाओमीचे हेडफोन मिळणार आहेत. Amazon Prime Days ची सुरुवात 15 जुलै रोजी होणार आहे.

यासोबतच कंपनी या महिन्यात के20 सीरीज आणि हेडफोन्ससह फास्ट चार्जर आणि Mi LED लॅम्पही लाँच करत आहे. येत्या 4 जुलै रोजी शाओमी भारतात रेडमी 7ए लाँच करत आहे.

शाओमीच्या या हेडफोन्समध्ये विशेष काय असेल याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. अमेझॉन लिस्टिंगनुसार शाओमीचा हा वायरलेस इअरफोन बेस लव्हर्ससाठी तयार करण्यात आला आहे आणि हा इअरफोन्स रेंजसह फास्ट कनेक्टिव्हिटी देतो.

रेडमी के20 सीरीज भारतात वनप्लस 7 प्रोला टक्कर देण्यासाठी लाँच करत आहे. कंपनीने टीजर प्रदर्शित करत म्हटलं की, शाओमी रेडमी के20 प्रो जगातील सर्वात जलद स्मार्टफोन आहे. हा फोन चीनमध्ये लाँच झाला असून त्यानंतर फक्त महिन्याभरात रेडमी K20 चे 10 लाख स्मार्टफोन विकले जातील, असा दावा कंपनीने केला आहे.