AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिनिश लाईन अवघी 500 मीटर दूर… अन् 25 वर्षीय धावपटूचा दुर्दैवी अंत!

हाफ मॅरेथॉनची फिनिश लाईन अवघी ५०० मीटर दूर असताना २५ वर्षीय दक्षिण कोरियन धावपटू यू जी-वोनचा मृत्यू झाला. या घटनेने क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

फिनिश लाईन अवघी 500 मीटर दूर... अन् 25 वर्षीय धावपटूचा दुर्दैवी अंत!
south korean running influencerImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 17, 2026 | 2:52 PM
Share

दक्षिण कोरियातील २५ वर्षीय धावपटू आणि इन्फ्लुएन्सर यू जी-वोन (Yoo Ji-won) हिचा हाफ मॅरेथॉन दरम्यान अचानक कोसळल्यानंतर मृत्यू झाला. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सोल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सोल रेस’ या स्पर्धेत ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, शर्यत पूर्ण करण्यासाठी अवघे ५०० मीटर अंतर बाकी असताना ती कोसळली.

अंतिम रेषेपासून ५०० मीटर अंतरावर कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजून ४९ मिनिटांनी यू जी-वोन हाफ मॅरेथॉनमध्ये धावत असताना अचानक बेशुद्ध होऊन कोसळली. त्यावेळी तिने २१ किलोमीटरच्या शर्यतीतील सुमारे २०.६ किलोमीटर अंतर पूर्ण केले होते.

घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला तातडीने प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेले नाही.

एआय सेमीकंडक्टर संशोधकही

यू जी-वोन ही केवळ धावपटू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नव्हती, तर ती दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित कोरिया ॲडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (KAIST) येथे संशोधनाशी संबंधित काम करत होती.

ती सोशल मीडियावर आपल्या धावण्याच्या सरावाचे व्हिडिओ, स्पर्धांमधील कामगिरी आणि प्रशिक्षणाचे अनुभव शेअर करत असे. अभ्यास आणि संशोधनासोबतच धावण्याची आवड जोपासल्यामुळे तिने अनेक धावपटूंचे लक्ष वेधून घेतले होते.

घटनेची चौकशी करणार

या घटनेनंतर ‘सोल रेस’च्या आयोजक समितीने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून यू जी-वोनच्या कुटुंबीयांप्रति शोक संवेदना व्यक्त केल्या. तसेच, या घटनेची सविस्तर तपासणी करून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सहकारी धावपटू, मित्र आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल