घोर कलियूग! 25 वर्षीय नातीसोबत 70 वर्षीय आजोबांनी उरकलं लग्न, व्हिडीओ पाहून संतापाल

Viral Video : घोर कलियुगातील अंधळं प्रेम! 25 वर्षीय नातीसोबत 70 वर्षीय आजोबांनी उरकलं लग्न, वृद्ध पुरुष म्हणाला, 'ती मोठी होण्याच्या प्रतीक्षेत होतो कारण...'

घोर कलियूग! 25 वर्षीय नातीसोबत 70 वर्षीय आजोबांनी उरकलं लग्न, व्हिडीओ पाहून संतापाल
| Updated on: Aug 05, 2025 | 12:27 PM

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कारण व्हिडीओमध्ये एका 25 वर्षीय मुलगी आणि 70 वर्षीय वृद्ध दिसत आहे… मुलगी आणि वृद्ध पुरुषाने एकमेकांसोबत लग्न केल्याचा दावा करण्यात येत आहे. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे, दोघांनी त्यांची ओळख नात आणि आजोबा अशी करुन दिली आहे. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचं सत्य नक्की काय आहे जाणून घेऊ… सध्या सर्वत्र व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लग्न झाल्यानंतर नात आणि आजोबा आनंदी दिसत आहे… नातीसोबत लग्न झाल्यानंतर वृद्ध पुरुष म्हणाला, ‘जेव्हा या मुलीचा जन्म झाला, तेव्हाच मी तिच्या प्रेमात होतो. मुलगी मोठी होण्याची प्रतीक्षा मी करत होतो. अखेर ती मोठी झाल्यानंतर आम्ही लग्न केलं…’ असं वृद्ध म्हणाला. हे ऐकून मुलाखत घेणारा आणि व्हिडिओमधील प्रेक्षक आश्चर्यचकित होतात.

 

 

हा व्हिडिओ सर्वात आधी एका यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला, नंतर तो इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुकवर वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि शेअर देखील केला.

नात आणि आजोबांचं लग्न

आजोबांसोबत लग्न केल्यानंतर मुलगी म्हणते, ‘मी लग्नानंतर प्रचंड आनंदी आहे. आजोबांनी मला कायम आदर आणि प्रेम दिलं. हे लग्न माझ्यासाठी आनंदी गोष्ट आहे… मला यामध्ये कोणतीच अडचण वाटत नाही…’ व्हिडीओवर अनेकांना कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक याला खरं प्रेम मानत आहेत. त्याच वेळी, काही लोक म्हणत आहेत की हे नातं नैतिकता आणि सामाजिक परंपरांच्या विरुद्ध आहे.

दरम्यान, व्हिडिओच्या सत्यतेबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही तथ्य तपासणी वेबसाइट्स आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांचं म्हणणं आहे की, हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असू शकतो, म्हणजेच तो आधीच लिहिला आणि कृतीत आणला गेला असावा. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत जे खरे नाहीत, तर फक्त व्ह्यूज आणि लाईक्स वाढवण्यासाठी असं करण्यात येतं.

म्हणजेच, ही नात आणि आजोबांचं लग्न खरं आहे की फक्त नाटक आहे हे स्पष्ट नाही. पण हे निश्चित आहे की या व्हिडिओने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे आणि सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.