
हरियाणातील एक महिला प्रियकराला भेटण्यासाठी जयपूरला गेली होती. या महिलेने लष्करी अधिकाऱ्यांसमोर गोंधळ घातला. रिपोर्ट्सनुसार, ही महिला लष्कराच्या जवानासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. या महिलेने विजेच्या खांबावर चढून बराच गोंधळही घातला.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. 20 मिनिटे पोलिस आणि मुलीमध्ये चांगलाच सामना रंगला. पोलीस त्या मुलीला समजावत होते. अखेर पोलिसांना महिलेला समजावून सांगण्यात यश मिळालं.
महिलेने पोलवरून खाली उतरण्यास होकार दिला. हरियाणाची रहिवासी असलेल्या या महिलेने सांगितले की, ती बऱ्याच काळापासून एका जवानासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती.
महिला खाली उतरल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. यानंतर पोलिसांनी या महिलेची चौकशी केली, त्यानंतर या महिलेनं लष्कराच्या जवानाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी जवानाला अटकही करण्यात आली आहे. सुरेंद्र असे या जवानाचे नाव सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्टेशन ऑफिसरने (एसएचओ) सांगितले की, लष्करी अधिकाऱ्यांनी या महिलेला जवानाला भेटण्याची परवानगी दिली होती.
मात्र यानंतर महिलेने बाहेर येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या प्रकरणी सध्या पुढील तपास सुरू आहे.