पावसाळ्यात स्वर्गात आल्याचा अनुभव, मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ आहे हे ठिकाण

पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे आणि मुंबईत देखील पावसाने हजेरी लावली आहे. येत्या १-२ दिवसात मान्सूनचा पाऊस सुरु होईल, पावसाळा सुरु झाला की सगळ्यांना बाहेर फिरण्याचे वेध लागतात. तुम्ही देखील मुंबई किंवा पुण्यात राहात असाल आणि तुम्हाला एका सुंदर ठिकाणाला भेट द्यायची असेल तर आम्ही तुम्हाला एक ठिकाणी सूचवत आहोत.

पावसाळ्यात स्वर्गात आल्याचा अनुभव, मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ आहे हे ठिकाण
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 5:08 PM

राज्यात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. या पावाळ्यात जर तुम्ही देखील वीकेंडला कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर हे ठिकाणी तुमच्यासाठी बेस्ट असू शकतं. पावसाळा सुरु झाला की, पर्यटक बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करतात. पावसाळ्यात अशी अनेक ठिकाणं आहेत जेथे गेल्यावर वेगळाच अनुभव येतो. आयुष्यात असा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. मुंबई -पुण्यापासून असंच एक ठिकाण अगदी काही तासांच्या अंतरावर आहे. येथे आल्यावर नक्कीच तुम्हाला स्वर्गात आल्याचा अनुभव मिळेल. तर मग चला करुया या ठिकाणाला भेट देण्याचे प्लानिंग.

आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते ठिकाण आहे माथेरान. माथेरान हे महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले एक छोटेसे सुंदर असे हिल स्टेशन आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. माथेरान पासून मुंबई केवळ 100 किलोमीटर अंतरावर आहे. माथेरानला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर चला सगळी माहिती घेऊयात.

मुंबई किंवा पुण्यात राहणाऱ्या लोकांना जर जवळच एखाद्या सुंदर ठिकाणी भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही माथेरानला भेट देऊ शकता. उन्हाळ्यात देखील येथे लोकं फिरण्यासाठी येत असतात. माथेरान हे एक उत्तम ठिकाण आहे. माथेरानला जर फिरायचे असेल तर मग पावसाळ्यात तुम्ही भेट देऊ शकता. कारण माथेरानमध्ये पावसाचा आनंद घेण्यात ही वेगळीच मज्जा असते. माथेरानमधून अनेक धबधबे तुम्हाला पाहायला मिळतील. सगळीकडे हिरवेगार निसर्ग आणि धुकं असतात जी आपल्याला स्वर्गात आल्याचा अनुभव देतात.

माथेरानला कसे जायचे

माथेरानला जाण्यासाठी सर्वात स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे लोकल ट्रेन. सीएसएसटी-दादर-ठाणे-कल्याण येथून तुम्ही खोपोली किंवा कर्जला जाणारी लोकल पकडू शकता. त्यानंतर तुम्हाला नेरळ या स्थानकावर उतारचे आहे. नेरळ येथून माथेरानला जाण्यासाठी टॅक्सी किंवा बस मिळतात.

माथेरानमध्ये प्रवेश शुल्क किती?

माथेरानला जाण्यासाठी तुम्हाला काही प्रवेश शुल्क देखील भरावा लागतो. हा प्रवेश शुल्क खूपच कमी असतो. तुम्ही एका दिवसात देखील माथेरानला भेट देऊन येऊ शकता. पण माथेरानचा प्लान करणार असाल तर दोन दिवसांचा करुन या. येथे राहण्यासाठी काही चांगली हॉटेल्स आणि होम स्टे देखील आहेत. जी तुम्हाला 1500 ते 2000 रुपयांपर्यंत मिळून जातात. इथे तुम्हाला जास्त खर्च देखील लागत नाही. त्यामुळे स्वस्तात मस्त प्लान होऊन जातो.

माथेरानमध्ये भेट देण्यासाठी काही ठिकाणं

माथेरानमध्ये तुम्हाला अनेक पॉइंट्स आहेत जेथे भेट देऊ शकतात. यामध्ये मंकी पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, शिवाजीचा जिना, शार्लोट लेक. येथे तुम्हाला टॉय ट्रेनचा आनंद देखील घेता येऊ शकतो. पण पावसाळ्यात ही ट्रेन बंद ठेवली जाते. चालण्याचा कंटाळा असेल तर तुम्ही येथे घोड्यावरुन सवारी करू शकतात. त्यावर बसून तुम्ही येथील सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.